मुंबई

Ambadas Danve : “मुलांच्या तोंडचा घास आफ्रिकेत!” – अंबादास दानवे यांचा महायुतीवर स्फोटक आरोप

Ambadas Danve  Latest News : ‘भ्रष्टाचार पे चर्चा’चे आव्हान; जागा-वेळ तुम्ही ठरवा – विरोधी पक्षनेते दानवे

छत्रपती संभाजीनगर :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Ambadas Danve  यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोपांचा भडिमार केला आहे. दानवे यांनी थेट सरकारवर “मुलांच्या तोंडचा घास आफ्रिकेत पळवण्याचा” आरोप करत, या प्रकरणी सरकारला ‘भ्रष्टाचार पे चर्चा’ करण्याचे खुले आव्हान दिले. विशेष म्हणजे, त्यांनी जागा आणि वेळ ठरवण्याचं स्वातंत्र्यही सत्ताधाऱ्यांना दिलं आहे.

हा आरोप ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या त्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला, ज्यात त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना “महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराची चर्चा शक्य त्या सर्व ठिकाणी सुरू करा” असं सांगितलं होतं.

सरकारी तांदळाच्या घोटाळ्याचा पर्दाफाश; ‘जे. व्ही. ग्रेन्स डीलर्स’वर बोट; दानवे यांचा आरोप थेट

मुलांच्या तोंडचा सरकारी तांदूळ थेट आफ्रिकेत कोण पोचवतंय, पाहू हे सरकारला ज्ञात आहे का? पहा हा भ्रष्टाचाराचा नवा फंडा..

जे. वी. ग्रेन्स डीलर्स ही नोंदणीकृत संस्था सामाजिक कार्यासाठी नोंदवली गेली. पण पहा, या संस्थेला मुंबई जिल्ह्यातील तांदूळ वाहतुकीचे कंत्राट देण्यात आले. या संस्थेचे अनिलकुमार गुप्ता यांची संस्थेबाबत वृत्ती ‘वरून सज्जन, आतून चोर’ अशीच आहे. संस्थेला होणार नफा सामाजिक उपक्रमासाठी वापरण्याऐवजी तो हे महाशय स्वतःच्या फायद्यासाठी वापरात असल्याचे समोर आले आहे. हे ऑडिटच्या शेअर होल्डींगच्या नमुन्यातून सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट झाले आहे. यांचे कारनामे पहा..

कारनामा 1..
संस्थेत 80 टक्के शेअरहोल्डर असलेले अनिलकुमार गुप्ता हेच महाशय तांदूळ वाहतुकीचे उपकंत्राटदार आहेत. यांना हे उपकंत्राट देताना नियम जात्यात दळून टाकले गेले आहेत. एवढ्यावर हे थांबत नाही. या उपक्रमांसातून येणार नफा हा थेट अनिलकुमार गुप्ता यांच्या खात्यात वळवला जात आहे. गुप्ताच तेच पुरवठ्यासाठी आवश्यक वाहनांचे मालक आहेत जी संस्थेच्या पैशातून खरेदी करण्यात आले.

कारनामा 2
संस्थेला आलेला निधी हा ‘अनसिक्योर्ड लोन’ म्हणून धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता अनिलकुमार गुप्ता यांनी स्वतःच्या खात्यात वळवला आहे. संस्थेला घरगड्यासारखे वागवल्याचा हा पुरावा.

कारनामा 3
कमी भावाने हे कंत्राटदार महाशय मुंबईच्या भागात अन्नधान्याची ने आण करतात. मग उरलेले पैसे येतात कोणीकडून. ही सेवा स्वस्तात देऊन ‘प्रधानमंत्री शक्ती निर्माण योजना’ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी येणार तांदूळ काळ्या बाजारात तर पळवला जात नाही? हे महाशय गुप्ता, शालेय मुलांसाठी येणार तांदूळ परदेशात.. विशेषतः आफ्रिकन देशात यांनी यासाठी जाळे उभे केल्याची माझी खात्रीलायक माहिती आहे.

कारनामा 4
जे. बी. ग्रेन डीलर्सच्या वतीने कोणतेही सामाजिक काम झालेले नाही. 5-10-2023 रोजी रेल्वे प्रशासनाने यांचे एक कंत्राट मुदतीपूर्वीच रद्द केले आणि डिपॉझिट जप्त केले आहे. अश्या संस्थेला आणि लोकांना कोणतेही टेंडर देता येत नाही. मग गुप्तांना हे महायुती सरकारचे लाडके लाभार्थी कसे?

या प्राकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट करून संस्थेची नोंदणी रद्द करण्यात यावी. या टेंडर घोटाळ्यात दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. अशी माझी मागणी आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

14 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

14 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

19 hours ago