मुंबई
Trending

Ambadas Danve : “महाराष्ट्रातील भाजप वाकेन पण मोडणार नाही….” विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे

Ambadas DanveTarget BJP : “महाराष्ट्रातील भाजप वाकेन पण मोडणार नाही….” विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्र वरील प्रेम कधीच निर्मळ नव्हते… अंबादास दानवे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट आरोप

मुंबई :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी गुजरात राजकोट Gujrat Rajkot येथे गेमिंग झोन झालेल्या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये दिले आहे. याचा संदर्भ देत शिवसेना ठाकरे गटाचे नेते विरोधी पक्ष नेते विधानपरिषद अंबादास दानवे Ambadas Danve यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील भाजप यांचे महाराष्ट्र प्रति प्रेम किती निर्मळ नव्हते हे या घटनेतून दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रातील भाजप वाकेन पण मोडणार नाही अशी टिका यांनी केली आहे.

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे Ambadas Danve Tweet यांनी ट्विट करत म्हणाले की,गुजरातेत राजकोट येथे झालेल्या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ लाख प्रत्येकी अशी मदत घोषित केली आहे. घाटकोपर होर्डिंग आणि डोंबिवली स्फोटातील लोकांना मात्र अशी मदत करायचे त्यांना सुचले नाही. महाराष्ट्राप्रती भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रेम कधीच निर्मळ नव्हते, याचा हा अजून एक नमुना.

पंतप्रधानांनी महाराष्ट्रात आलेल्या संकटाकडे ढुंकूनही पाहिले नाही

फायन वादळाने झालेल्या नुकसानीकडे त्यांनी ढुंकून पाहिले नाही. मराठवाड्यातील दुष्काळ पाहण्यासाठी चमू पाठवण्याचे ढोंग केले. पावसाळा तोंडाशी आला तरी एक दमडी येथील शेतकऱ्यांना त्यांनी दिली नाही. पण महाराष्ट्रातील भाजप, ‘वाकेन पण मोडणार नाही’चे प्रणेते शिंदे गट आणि अर्थमंत्री महोदय यावर काहीच बोलणार नाहीत.

Web Title : Ambadas Danve : “BJP in Maharashtra will bend but not break….” Opposition leader Ambadas Danve

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0