सामाजिक

आमदार काळेंच्या प्रयत्नातून अजय च्या कुटुंबियांना तात्काळ मदत

कळंब, प्रतिनिधी – दि.२८ तालुक्यातील भाटशिरपुरा येथील अजय आसाराम गायकवाड या तरूणांचा दिनांक 21/9/2024 रोजी शेतातील सोयाबीनची गंज झाकण्यासाठी गेले असता विज पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. घरातील तरुण मुलगा गेल्याने जिल्हाभर हळहळ व्यक्त होत होती. आमदार विक्रम काळे यांनी तात्काळ कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले आणि तेवढ्यावरच न थांबता वैयक्तिक प्रशासकीय पाठपुरावा करत आठ दिवसांत चार लाखांचा धनादेश त्याच्या कुटुंबीयांना सुपूर्द केला. यासाठी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले यांनीही त्वरित प्रशासकीय हालचाली केल्या असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले. इतकी तात्काळ मदत पहीलयांदाच मिळाली असल्याने कुटुंबासह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
धनादेश सुपूर्द करताना आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी लकडे,अंकुश नाडे, युवक जिल्हाउपाधयक्ष राहुल हौसलमल, संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक अतुल गायकवाड, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रम चोंदे,कळंब शहराध्यक्ष दत्ता तनपुरे, उपाध्यक्ष गणेश भोसले, प्रकाश बावणे, अच्युतराव गायकवाड आदी उपस्थित होते.

Deepak

Share
Published by
Deepak

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

12 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

12 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

18 hours ago