ठाणेमुंबई
Trending

Parshuram Kadam : शिवसेनेची ‘बंडखोरांविरुद्ध’ सर्जिकल स्ट्राईक! युवासेना विस्तारक परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी

Shinde Group Take Action On Parshuram Kadam : अधिकृत उमेदवाराविरोधात शड्डू ठोकणे पडले महागात; ‘गद्दारी खपवून घेणार नाही’, जिल्हाप्रमुखांचा कडक इशारा

रत्नागिरी | रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने (शिंदे गट) शिस्तभंगाची मोठी कारवाई केली आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार सुयोग कांबळे यांच्याविरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल करणारे युवासेना कोकण विस्तारक परशुराम कदम Parshuram Kadam यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?

जिल्हा परिषद निवडणूक 2026 मध्ये रत्नागिरी तालुक्यातील 35-हातखंबा गटातून शिवसेनेने सुयोग नंदकुमार कांबळे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र, माजी जिल्हा परिषद सभापती राहिलेल्या परशुराम कदम यांनी या निर्णयाला आव्हान देत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. वारंवार सूचना देऊनही त्यांनी आपली उमेदवारी मागे न घेता उघडपणे पक्षविरोधी प्रचार सुरू केल्याने पक्षनेतृत्वाने हा कठोर निर्णय घेतला आहे.

‘पक्ष आणि संघटनेशी गद्दारी’

जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात परशुराम कदम यांच्यावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “परशुराम कदम यांचे कृत्य म्हणजे थेट शिवसेना पक्ष, नेतृत्व आणि संघटनेशी केलेली गद्दारी आहे. पक्षशिस्त आणि संघटनात्मक धोरणांना हरताळ फासणाऱ्या अशा व्यक्तींना शिवसेनेत स्थान नाही. त्यामुळे त्यांची सर्व पदांवरून आणि पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात येत आहे,” असे पंडित यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0