Alibhaug News : पर्यटक व तरुणांमध्ये अमली पदार्थ पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

Alibhaug Latest Crime News : 2.6 किलो चरससह 13 लाखांचे अमली पदार्थ जप्त; आणखी एक आरोपी फरार
अलिबाग | रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरुड परिसरात अमली पदार्थांची साखळी तयार करून पर्यटक आणि स्थानिक तरुणांमध्ये चरस पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. रायगड पोलिसांनी या कारवाईत तब्बल 13 जणांना अटक केली असून, मुख्य सूत्रधार विशाल जैसवाल याला नेपाळ पोलिसांच्या Nepal police मदतीने अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एकूण 13 लाख 61 हजार रुपये किमतीचा 2 किलो 659 ग्रॅम चरस जप्त केला आहे. Alibhaug Latest Crime News
टोळीचा मास्टरमाइंड विशाल जैसवाल उत्तर प्रदेशमधील पोखरभिंडाचा रहिवासी असून, नेपाळमधून चरस आणून अलिबाग-मुरुडमध्ये स्थानिक नेटवर्कद्वारे विक्री करत होता. यासाठी त्याने बीचवरील घोडेवाले, स्थानिक दुकानदार, आयस्क्रीम विक्रेते अशा विविध घटकांना आपल्या जाळ्यात ओढले होते. मुरुड तालुक्यात शिघ्रे पोस्टवरील नाकाबंदीदरम्यान अलवान निसार दफेदार या 19 वर्षीय तरुणाकडून 776 ग्रॅम चरस सापडल्यावर ही कारवाई उघडकीस आली.
अलिबाग-मुरुडमध्ये चरस तस्करीचा भांडाफोड; 13 जणांना अटक, मुख्य सूत्रधार नेपाळमधून गजाआड
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये विशाल जैसवालसह अनुप, अनुज जैसवाल, आशिष डिगे, प्रणित शिगवण, आनस कबले, वेदांत पाटील, साहील नाडकर, अनिल पाटील, सुनिल शेलार, राजु खोपटकर, खुबी भगेल यांचा समावेश आहे. आणखी एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्पष्ट केले की, “रायगड जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबवले जाईल. संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे प्रकार घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी होईल.” या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.



