Alibaug Crime News : वेतन आणि भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील वरिष्ठ ‘लिपिक’ ‘एसीबी च्या जाळ्यात
•थकित बिले मंजूर करण्यासाठी कनिष्ठ लिपिकाने मागितली दोन हजार रुपयाची लाच, लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई वरिष्ठ लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
अलिबाग :- शिक्षक संस्थेतील लिपिकाच्या वैद्यकीय बिल आणि थकीत वेतन बिल मंजूर करण्याबाबत वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाने दोन हजार रुपयाची लाच मागितली होती. थकीत वैद्यकीय बिल करिता पाचशे रुपये तर वेतन बिल मंजूर करण्याकरिता दीड हजार रुपये असे मिळून दोन हजार रुपयाचे वरिष्ठ लिपिकाने तक्रारदार यांच्याकडे मागणी केली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड अलिबाग युनिटने सापळा रचून लाचखोर वरिष्ठ लिपिक संदीप शामराव गोळे (45 वय) कनिष्ठ लिपिक याला रंगेहात पकडण्यात आले आहे. संदीप गोळे हे वेतन व भविष्य निर्वाह पथक अलिबाग रायगड येथे कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार हे शिक्षण संस्थेत लिपीक असून, तक्रारदार यांचे यापुर्वी मंजुर केलेले वैद्यकीय बिल अदा केल्याच्या मोबदल्यात रूपये 1.5 हजार व फेब्रुवारी 2022 या महिन्याने थकीत वेतन बिलास मंजुर करण्याकरीता 500 रुपये अशी एकुण दोन हजार लाचेची मागणी करीत असलेबाबत संदीप शामराव गोळे (कनिष्ठ लिपीक, वेतन व भविष्य निर्वाह पथक, अलिबाग,) यांचे विरूध्द तकार प्राप्त झाली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणीच्या वेळी गोळे यांनी तक्रारदार यांचेकडे जयकिसान विद्यामंदिर, वडथळ येथे दोन हजार रूपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम तात्काळ स्वीकारण्याचे मान्य केले. जयकिसान विद्यामंदिर, वडखळ येथे सापळा रचून संदीप गोळे यांना तक्रारदार यांचेकडून दोन हजार लाचेची रक्कम स्वीकारताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्यूरो ठाणे परिक्षेत्र ठाणे, महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शशीकांत पाडावे पोलीस उप अधीक्षक,ॲन्टी करप्शन ब्युरो, रायगड-अलिबाग यांनी कारवाई करत लाचखोर लिपिकास अटक केली आहे.वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.