अलिबाग एसीबी कारवाई ; 50 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवक आणि लिपिक अटकेत
Anti Corruption Bureau Trap News : कुरुळ ग्रामसेवक आणि लिपिक यांच्यावर एसीबीची कारवाई, लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले
“Mystery surrounds Alibag ACB raid; village officials caught with 50K bribe”
रायगड :- मौजे कुरुळ (ता. अलिबाग) यातील ग्रामसेवक आणि लिपिक यांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभाग, रायगड अलिबाग यांनी बेड्या ठोकल्या आहे. “Colorful Corruption: ACB catches rural officials taking bribes in Kurul” एसीबीने लाचखोर शासकीय अधिकाऱ्यांच्या लाच मागितल्या प्रकरणी मुसक्या आवळल्या आहे. श्रीहरी अर्जुनराव खरात, (36 वर्ष, ग्रामसेवक), सुजित शाम पाटील उर्फ पिंट्या, (39 वर्ष, लिपिक,) कुरूळ ग्रामपंचायत, ता.अलिबाग यांना एसीबीने रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
तक्रारदार यांचे मौजे कुरूळ गट कमांक 34/4 या जागेवर स्वतंत्र घर बांधलेले आहे. घरास घरपट्टी आकारून असेसमेंट उतारा मिळणेकरीता श्रीहरी खरात, ग्रामसेवक 50 हजार रुपयांची लाचेची मागणी करीत असलेबाबत तक्रार प्राप्त झाली होती. “Provocative Practices: ACB exposes bribery scandal in Kurul village” तक्रारदार यांचेकडे ग्रामपंचायत कार्यालय, कुरूळ येथे 50 हजारांची लाचेची मागणी करून, लाचेची रक्कम सुजित शाम पाटील उर्फ पिंट्या लिपिक, कुरूळ ग्रामपंचायत यांचेकडे देण्यास सांगितली. आज (20 ऑगस्ट) एसीबीने कुरूळ ग्रामंपचायत कार्यालयात सापळा रचला होता.
ग्रामसेवक खरात यांनी तक्रारदार यांचेकडे पुर्वी मागणी केल्याप्रमाणे 50 हजार रुपयांची लाचेची मागणी करून लाचेची रक्कम लिपिक सुजित शाम पाटील उर्फ पिंट्या यांचेकडे देण्यास सांगितले, त्याप्रमाणे लिपिक पाटील यांना तक्रारदार यांचेकडून कुरूळ ग्रामपंचायत कार्यालय आवारात 50 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्विकारताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले आहे. “Provocative Practices: ACB exposes bribery scandal in Kurul village” एसीबीने ग्रामसेवक आणि लिपिक यांच्यावर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र ठाणे महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शशीकांत पाडावे पोलीस उप अधीक्षक,ॲन्टी करप्शन ब्युरो, रायगड-अलिबाग यांनी कारवाई करत ग्रामसेवक आणि लिपिकाला अटक केली आहे. “Trending Scandal: ACB’s Kurul Raid Exposes Corruption in Alibag’s Village Panchayat”