बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला, स्वतःही जखमी
Badlapur Accused Akshay Shinde Death : आरोपी अक्षय शिंदे याला पोलिस कोठडीत देण्यात आली होती. त्यानंतर त्याने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला.
बदलापूर :- बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने (Death of the accused in Badlapur Case) सोमवारी (23 सप्टेंबर) पोलिसांवर गोळीबार केला आहे. (Accused Akshay Shinde Death) ही घटना घडली तेव्हा शिंदे याला पोलीस कोठडीत नेण्यात आले होते. (Badlapur Case) त्याने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करताना एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला.
अक्षय शिंदेला अटक केल्यानंतर तळोजा कारागृहातून नेत असताना त्याने कारमधील पोलिसाची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. याशिवाय आरोपी शिंदे याने आणखी दोन गोळ्या झाडल्या ज्या कोणालाही लागल्या नाहीत. यानंतर दुसऱ्या एका पोलिसाने स्वसंरक्षणार्थ बंदूक काढून अक्षय शिंदेवर गोळीबार केला.
12 आणि 13 ऑगस्ट रोजी बदलापूर येथील शाळेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदे याच्यावर दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. पीडितेने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतरच ही बाब समोर आली. या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला होता. आंदोलकांनी सुमारे 10 तास रेल्वे मार्ग रोखून धरला होता.
उज्ज्वल निकम म्हणाले की,कुणीही कुठल्या प्रकारचे या घटनेचे राजकारण करता कामा नये. या घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल. परंतु याचे राजकारण करून त्यातून वेगळा अर्थ काढण्यात आता काहीही अर्थ नाही. परंतु आरोपीविरोधात भक्कम पुरावे होते आणि त्याला दोन बालिकांनी ओळखले होते. त्यामुळेच त्याची मानसिक स्थिती बिघडली असून त्याने स्वतःवर गोळीबार केला असल्याची शक्यता अँडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी वर्तवला आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, विकृत असलेल्या माणसाला पोलिसांनीही सांभाळून ही परिस्थिती हाताळायला हवे होते. पोलिसांनी त्याला गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. त्याच्याकडे जे व्हिडिओ मिळाले आहेत. तो केवळ एका प्रकरणातील आरोपी नसून त्याच्याकडे अनेक प्रकरणांत अडकणार असल्याची भिती होती. त्यामुळे जगण्यापेक्षा आपण जीवन संपवायचे असे त्याला वाटले असल्याचेही शिरसाठ म्हणालेत.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, ही घटना धक्कादायक आहे. एका आरोपीने स्वतःवर गोळी झाडली ही इतकी सामान्य घटना नाही. हैदराबादमध्ये चार आरोपींवर गोळीबार करून त्यांचे एन्काउंटर करण्यात आले. तसेच या प्रकरणात नेमके काय झाले? याची सीबीआय चौकशी करायला हवी