मुंबई
Trending

Akhil Chitre : आदित्य ठाकरे यांचा राज ठाकरे यांना मोठा धक्का, मनसेच्या मोठ्या नेत्यांच्या शिवसेनेत प्रवेश!

MNS leader Akhil Chitre joined Shiv Sena in the presence of Aditya Thackeray : मनसेच्या तरुण नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे.या पक्षप्रवेशाने मनसेला वांद्रे पूर्वेत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

मुंबई :- राज्यात राज ठाकरे यांच्या सभेचा झंझावातात चालू असताना राज ठाकरे Raj Thackeray यांना आणि त्यांच्या मनसेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज ठाकरेंना हा धक्का दिला आहे. मनसेचे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्र Akhil Chitre यांनी मनसेची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटाचं शिवबंधन हाथी बांधलं आहे. अखिल चित्रे यांनी ठाकरे गटाची मशाल हाथी घेतली आहे. त्यामुळे मुंबईत स्थानिक पातळीवर विद्यार्थी संघटना आणि युवा सेना आणखी ताकदवान होणार आहे.अखिल चित्रे हे मनसेचे तडफदार नेते मानले जायचे. पण त्यांनी अचानक विधानसभेच्या काळात ठाकरे गटात प्रवेश केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

वांद्रे पूर्व मतदारसंघात मनसेकडून तृप्ती सावंत यांना विधानसभेचं तिकीट दिल्याने अखिल चित्रे नाराज असल्याची माहिती येत होती. अखेर त्यांनी मनसे पक्षालाच सोडचिठ्ठी दिली आहे. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि वांद्रे उमेदवार वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत चित्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.माझी राजकीय सुरुवात केली होती तेव्हा मी भारतीय विद्यार्थी सेनेचा युनिट प्रमुख, कॉलेजप्रमुख म्हणून सुरुवात केली होती. मी ज्या ठिकाणाहून राजकारण सुरु केलं होतं अगदी त्याच ठिकाणावर परत यावं, असं मला वाटलं. त्यामुळे मी पुन्हा या पक्षात प्रवेश केला आहे”, असं अखिल चित्रे यांनी स्पष्ट केलं.

ज्या विचाराबरोबर मी गेल्या 18 वर्षांपासून होतो तो विचार आता माझ्या पूर्वीच्या पक्षातून बाजूला टाकण्यात आला आहे. राज ठाकरे आताच मागे म्हणाले होते की, मला दुसऱ्यांची मुलं अंगावर खेळवायची नाहीत. मला माझीच मुलं खेळवायची आहेत. माझ्यात ती क्षमता आहे. पण वांद्रे पूर्वेत चार पक्ष फिरुन आलेल्या महिलेला तिकीट देण्यात आलं. त्या इकडे निवडून येण्यासाठी आल्या नाहीत तर फक्त कुणालातरी पाडण्यासाठी उभ्या आहेत. अशा विचाराने राजकारण होत नाही. त्यामुळे मी आधी जिथे होते तिथे परत जावं असं मला वाटलं”, अशी भूमिका अखिल चित्रे यांनी मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0