•अजित पवार यांच्या पत्नी यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे उमेदवारी अर्ज भरला
मुंबई :- लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या संमतीने घेतला आहे. दरम्यान, गुरुवारी (13 जून) राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी मुंबईत विधानभवनात पोहोचून उमेदवारी दाखल केली.
25 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी अजित पवार यांनी त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी पक्षाच्या मंत्र्यांसोबत बोलावलेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले. या बैठकीला राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यास आपला कोणताही आक्षेप नाही, मात्र त्यांच्या नावाची शिफारस करण्यासाठी बैठक का बोलावण्यात आली नाही, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी 2022 च्या राज्यसभा निवडणुकीचा राजीनामा दिला होता आणि 2024 मध्ये पुन्हा राज्यसभा खासदारपद स्वीकारले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या एका राज्यसभेच्या खासदाराची जागा रिक्त झाली होती. आता या रिक्त जागेवर जो येईल त्याला सुमारे चार वर्षे खासदार राहण्याची संधी मिळणार आहे. प्रफुल्ल पटेल यांचा पहिला राज्यसभेचा कार्यकाळ 2022-2028 चा होता. आता सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्या तर त्या 2028 पर्यंत खासदार राहतील.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…