पुणे
Trending

Pune BJP News : पुण्यात पुन्हा ‘कमळ’ फुललं! 6 फेब्रुवारीला पुण्याचा नवा कारभारी ठरणार; भाजपमध्ये ‘महापौर’ पदासाठी महिलांची चुरस

Pune Mayor News : पुणे महापालिकेत 119 जागांसह भाजपला स्पष्ट बहुमत; ‘ओपन महिला’ आरक्षणामुळे इच्छुकांच्या हालचाली वाढल्या; 6 फेब्रुवारीला विशेष सभेचे आयोजन

पुणे l राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीनंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे. मुंबईत महापौरपदाचा पेच कायम असताना पुण्याने मात्र आघाडी घेतली असून, येत्या 6 फेब्रुवारी 2026 रोजी पुण्याच्या नवीन महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार सकाळी 11 वाजता ही विशेष सभा पार पडणार असून, याच दिवशी पुण्याच्या नवीन कारभाऱ्याचे नाव अधिकृतपणे जाहीर होईल.

पुणे महापालिकेत ‘महिला राज’ नुकत्याच झालेल्या महापौर आरक्षणाच्या सोडतीत पुण्याचे महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’ (Open Women) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. भाजपला 165 पैकी 119 जागांवर अभूतपूर्व विजय मिळाल्यामुळे भाजपचा महापौर होणे ही केवळ औपचारिकता उरली आहे. मात्र, पक्षात अनेक महिला दिग्गज निवडून आल्याने ‘कोणाची वर्णी लागणार?’ याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापौरपदासाठी कोणाची नावे चर्चेत?

पुणे महापालिकेत अनुभवी नगरसेविकांपासून ते नव्या दमाच्या उमेदवारांपर्यंत अनेकांची नावे चर्चेत आहेत:

वर्षा तापकीर: सलग चार वेळा निवडून आलेल्या ज्येष्ठ नगरसेविका.

मानसी देशपांडे: विजयाची हॅट्रिक केलेल्या आणि मंत्री माधुरी मिसाळ यांच्या नातेवाईक.

मंजुषा नागपुरे: बिनविरोध निवडून आलेल्या भाजपच्या आक्रमक नेत्या.

नवीन चेहरे: स्वरदा बापट, ऐश्वर्या पठारे आणि तृप्ती भरणे यांच्या नावांचीही पक्षात चर्चा आहे.

महापौर बंगला सज्ज! 2022 पासून प्रशासकीय राजवट असल्याने पुण्याचा ऐतिहासिक महापौर बंगला रिकामा होता. आता नव्या महापौरांच्या स्वागतासाठी या बंगल्यात रंगकाम आणि फर्निचरचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. अनेक ऐतिहासिक निर्णयांचा साक्षीदार राहिलेला हा बंगला पुन्हा एकदा राजकीय धामधुमीने गजबजणार आहे.

पुणे महानगरपालिका – पक्षीय बलाबल

भाजप 119

राष्ट्रवादी (अजित पवार) 27
काँग्रेस 15
राष्ट्रवादी (शरद पवार) 03
शिवसेना (ठाकरे गट) 01
शिवसेना (शिंदे गट) 00

एकूण 165

विरोधी पक्षांकडे संख्याबळ कमी असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार की केवळ औपचारिकता म्हणून विरोधी पक्ष उमेदवार उभा करणार, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, सध्या पुण्यात देवेंद्र फडणवीस कोणत्या ‘लाडक्या बहिणीला’ पुणे शहराचे प्रथम नागरिकत्व बहाल करतात, याचीच सर्वाधिक चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0