मुंबई

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने बॅगेची केली तपासणी

Ajit Pawar Maharashtra Vidhan Sabha Election 2024: Ajit Pawar Maharashtra Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरे, अमोल कोल्हे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या बद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची ही हेलिकॉप्टरची तपासणी केली आहे

मुंबई :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या बॅगांची तपासणी करण्याच्या मुद्यावरून राज्याचे राजकारण तापले असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar Bag Cheked यांच्याही बॅगा व हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आल्याची घटना घडली आहे. या तपासणीत अधिकाऱ्यांच्या हाती एका बॅगेत चकल्या लागल्या. अजित पवारांनी त्या त्यांना खाण्याची सूचना केली. यावेळी उपस्थितांत एकच हशा पिकला. दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने Election Commission Flying Squad बॅगा तपासल्या, त्यानंतर खासदार अमोल कोल्हे,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यसेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर अजित पवार यांचे बॅग तपासण्यात आले आहे

उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची यवतमाळ व लातूरमध्ये तपासणी करण्यात आली होती. या मुद्यावरून त्यांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली होती. निवडणूक आयोगाने केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांच्याच बॅगांची तपासणी करू नये. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महायुतीच्या सर्वच नेत्यांच्या बॅगांची तपासणी करण्याची मागणी केली. विशेषतः त्यांनी ही तपासणी केली नाही तर आमचे शिवसैनिकच अशी तपासणी करतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

अजित पवारांच्या सामानात एक डब्बाही निघाला. त्यांनी तो डब्बाही अधिकाऱ्यांना तपासण्याची सूचना केली. यावेळी ते अधिकाऱ्यांसोबत संवाद साधतानाही दिसून आले. या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ अजित पवार यांनी ट्विट केला आहे. मी निवडणूक प्रचाराला जात असताना निवडणूक आयोगाने माझी बॅग व हेलिकॉप्टरची नियमित तपासणी केली. मी त्यांना पूर्ण सहकार्य केले. माझ्या मते, स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी अशा उपाययोजना आवश्यक आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी कायद्याचा आदर करत आपल्या लोकशाहीची अखंडता टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांना सहकार्य करू या, असे अजित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

51 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago