Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या उमेदवारांची दुसरी यादी, जाणून घ्या अजित पवारांनी झीशान सिद्दीकी-सना मलिकसह कुणाला दिले तिकीट?
NCP List of Maharashtra Assembly Election: शुक्रवारी राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या झीशान सिद्दीकी यांच्या नावाचा समावेश आहे.
मुंबई :- अजित पवार Ajit Pawar यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी विधानसभा निवडणुकीची NCP List of Maharashtra Assembly Election दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये झिशान सिद्दीकी यांना (वांद्रे पूर्व) मधून, तर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्ती नगरमधून तिकीट देण्यात आले आहे.जीशान सिद्दीकी यांनी आज आपला जुना पक्ष काँग्रेस सोडून अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित गटाने निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे.तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघातून संजयकाका रामचंद्र पाटील यांना तिकीट मिळाले आहे. याशिवाय वडगाव शेरीतून सुनील टिंगरे, शिरूरमधून ज्ञानेश्वर कटके आणि लोहा विधानसभा मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर यांना तिकीट देण्यात आले आहे.
यापूर्वी, 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून, छगन भुजबळ येवल्यातून आणि दिलीप वळसे पाटील आंबेगावमधून निवडणूक लढवणार आहेत. अशा स्थितीत राष्ट्रवादीचे एकूण 45 उमेदवार आत्तापर्यंत मैदानात उतरले आहेत.