मुंबई

Chandrashekhar Bawankule : राहुल गांधींना बावनकुळेंचं आकड्यांनी प्रत्युत्तर – “2009 ला 30 लाख मतदार वाढले, तेव्हा घोटाळा का झाला नाही?”

•Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi : “स्वतःचं अपयश झाकण्यासाठी दोषारोप करणं थांबवा”, बावनकुळे यांचा सल्ला

मुंबई :- राहुल गांधींनी महाराष्ट्रातील मतदार यादीतील वाढ ‘संशयास्पद’ ठरवत निवडणूक आयोगावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, आणि त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आकड्यांच्या आधारे झणझणीत प्रत्युत्तर दिलं आहे.

राहुल गांधी म्हणतात महाराष्ट्रात 5 महिन्यांत 39 लाख मतदारांची वाढ “संशयास्पद” आहे. पण राहुलजी 2009 ला काय झालं होतं? तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो.

एप्रिल 2009 ला लोकसभा निवडणुकीत 7 कोटी 29 लाख 54 हजार मतदार होते तर ऑक्टोबर 2009 ला विधानसभा निवडणुकीत 7 कोटी 59 लाख 68 हजार मतदार झाले. तेव्हाही फक्त 5 महिन्यांत 30 लाख मतदार वाढले होते!

तेव्हा तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस-आयोग युतीच होती? तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? याचं उत्तर द्या.
2004, 2009 ला जिंकलात तेव्हा काही प्रश्न पडले नाहीत! आज पराभव झाला, महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला झिडकारलं तेव्हा रडगाणं सुरू झालं.

राहुलजी आकड्यांचं अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात.

आमच्या महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने बहुमताने निवडून दिले. जनतेने आमच्यावर दाखविलेला हा विश्वास आहे. तो पुढील निवडणुकीतही असाच अभंग राहील. आपण वारंवार खोटे बोलून राज्यातील जनदेशाचा अपमान करीत आहात. जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0