Ajit Pawar on Sunetra Pawar : अजित पवारांच्या भूमिकेत बदल! ‘चूक झाली, सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे…’
Ajit Pawar on Sunetra Pawar : लोकसभा निवडणुकीत बहिण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणे चुकीचे असल्याचे अजित पवार यांनी मान्य केले. त्यांनी घरात राजकारण आणायला नको होते, असे ते म्हणाले.
पुणे :- उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar राज्यात जन सन्मान यात्रा काढत आहेत. यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीतील बारामती मतदारसंघातील पराभवाबाबत अजित पवार यांनी मोठा दावा केला आहे. या जागेवरून बहिण सुप्रिया सुळे यांच्यासमोर पत्नी सुनेत्रा पवार Sunetra Pawar यांना उमेदवारी देणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. Maharashtra Political Latest News
एका वृत्तवाहिनीला मुलाखती दरम्यान अजित पवार यांनी त्यांचा निर्णय चुकीचा मानला. त्यांनी घरात राजकारण आणायला नको होते, असे राष्ट्रवादीचे अजित पवार म्हणाले. त्यावेळी त्याच्याकडून चूक झाली. बहीण सुप्रिया यांच्यासमोर त्यांनी पत्नी सुनेत्रा यांना निवडणुकीत उतरवायला नको होते.रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी 19 ऑगस्टला आपण सुप्रिया सुळेंना भेटायला जाणार असल्याचंही अजित पवारांनी संवादात म्हटलं आहे. Maharashtra Political Latest News
लोकसभा निवडणुकीत ननंद विरुद्ध भाऊजाई एकमेकांविरोधात उभे करण्याच्या निर्णयावर अजित पवार पुढे म्हणाले, ‘…पण त्यावेळी संसदीय मंडळाने निर्णय घेतला. एकदा का बाण धनुष्यातून सुटला की काहीही करता येत नाही. पण आज माझं मन मला सांगतं की असं व्हायला नको होतं. Maharashtra Political Latest News