Ajit Pawar : मी जेव्हा त्यांच्या सोबत होतो त्यांना छान वाटायचं; उपमुख्यमंत्री अजित पवार
Ajit Pawar On Uddhav Thackeray : – माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पाने नंतर केलेल्या टीकेला अजित पवार यांच्याकडून प्रत्युत्तर
मुंबई :- राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. या टिकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले की, मी ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये होतो, त्यावेळी मी अर्थसंकल्प मांडल्यानंतर ते मला फार छान आहे, फार छान आहे असे म्हणायचे, आता मी इकडे आहे म्हणून म्हणतात, त्यांच्या टीकेला काहीही अर्थ नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना एकाच वाक्यात टोला लगावला. Ajit Pawar On Uddhav Thackeray
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
चार महिन्यांचा अर्थसंकल्प असला तरी हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. मोदी साहेबांच्या विकसीत भारत या संकल्पनेला पुरक असा हा अर्थसंकल्प आहे. सर्व घटकांचा या अर्थसंकल्पात समावेश झाला आहे. पायाभूत सुविधांसाठी यात मोठ्या प्रमाणात समावेश आहे. शहरी, ग्रामीण, रेल्वे मार्गांना या अर्थसंकल्पात प्राधान्य दिले आहे. पायाभूत सुविधांना प्राधान्य दिल्याने राज्याचा विकास होतो.
महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने विशेष योजना त्याला तरतूद केलेली आहे. जलसंपदा विभागासाठी व शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागते. त्यासाठी आर्थिक तरतूद केलेली आहे. उद्याच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. तसेच तीर्थस्थळे, गडकोट किल्ले याला देखील प्राधान्य दिलेले आहे. एकंदरीत सर्वसमावेशक व सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या किस्स्याची आठवण
ठाकरेंना बजेटमधील काही कळत नाही अजित पवार यांच्या उत्तरानंतर लगेचच मुख्यमंत्री शिंदेंच्या बाजूला उभे असलेले देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, खरं म्हणजे, उद्धव ठाकरेंनी यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं, मला अर्थसंकल्प कळत नाही, त्यामुळे त्यांच्यावर न बोललेलं बरं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.