महाराष्ट्र
Trending

Ajit Pawar : विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार

Vidhan Sabha Deputy Speaker : राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना उपाध्यक्ष पदासाठी महायुतीकडून उमेदवारी

मुंबई :- महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यात महायुतीचे म्हणजेच भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) Ajit pawar यांची सरकार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभा उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधानसभा अध्यक्ष हे पद भाजपाच्या राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे. तर शिंदे सरकारच्या वेळेस उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ यांच्याकडे होते.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे Anna Bansode यांची विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अण्णा बनसोडे यांनी उपाध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरला आहे.दरम्यान, विधानसभा उपाध्यक्ष पदाची माळ अण्णा बनसोडे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता अधिक आहे. अण्णा बनसोडे अजित दादा समर्थक आमदार आहेत. तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

आमदार अण्णा बनसोडे हे पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले आहेत. 2009 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2019 आणि 2024 असे सलग दोनवेळा त्यांनी पुन्हा आमदारकी मिळवली. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्या पाठीशी राहिले आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडूनही आले. दादांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरीचे ते भक्कम शिलेदार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0