Sachin Tendulkar On Ajit Pawar : “महाराष्ट्राने कष्टाळू नेता गमावला”; अजिंक्य रहाणे, युसूफ पठाण आणि अझरुद्दीन यांनी वाहिली श्रद्धांजली
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘पॉवर प्ले’ ज्यांच्या नावाशिवाय अपूर्ण होता, त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे पडसाद आता क्रीडा जगतातही उमटले आहेत. बुधवारी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी झालेल्या भीषण विमान अपघातात अजितदादांचा अंत झाल्याची बातमी समजताच क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर याने अजित पवारांना ‘कष्टाळू नेता’ संबोधत आपली श्रद्धांजली अर्पण केली.
सचिन तेंडुलकरची भावूक पोस्ट
नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या अजितदादांच्या जाण्याने सचिन तेंडुलकर व्यथित झाला आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले:
“महाराष्ट्राने आज एक महान आणि कष्टाळू नेता गमावला आहे. अजित पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.”
अजिंक्य रहाणेकडून ‘दादां’ना मानवंदना
भारतीय क्रिकेट संघाचा मुंबईकर फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने देखील दादांच्या जाण्याने मोठे दुःख झाल्याचे सांगितले. “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला खूप वेदना झाल्या आहेत. या कठीण प्रसंगात त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत,” असे अजिंक्यने नमूद केले.
युसूफ पठाण आणि अझरुद्दीन यांनी जागवल्या आठवणी
माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाण यांनी अजितदादांना एक ‘मेहनती नेता’ म्हणून ओळखले. “विमान अपघातात त्यांच्या निधनाची बातमी हृदयद्रावक आहे,” अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला. त्याचप्रमाणे, भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि तेलंगणाचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन यांनीही अजित पवारांच्या निधनावर शोक व्यक्त करत, देशाने एक अनुभवी नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त केली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…