पुणे

Ajit Pawar : गुंड घायवळच्या भावाला परवाना प्रकरण: अजित पवारांचा कठोर इशारा

Ajit Pawar On Criminal Nilesh Ghaywal : “शस्त्र परवाना दिलेला नाही, स्वतः आयुक्तांनी मला सांगितले” – अजित पवार

पुणे :- पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरण आणि त्यातून चर्चेत आलेल्या निलेश घायवळचा Nilesh Ghaywal भाऊ सचिन घायवळ याला गृहराज्यमंत्री योगेश कदम yogesh Kadam यांनी अधिकार वापरून शस्त्र परवाना दिल्याचा कथित वाद आता राज्य पातळीवर पोहोचला आहे. या प्रकरणावर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांना कोणताही राजकीय हस्तक्षेप न घेता दोषींवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. Maharashtra Politics News

पुण्यात राष्ट्रवादीच्या ‘परिवार मिलन’ कार्यक्रमानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “मी स्वतः पोलीस आयुक्तांना (CP) सांगितले आहे, कोण कुठल्या गटाचा, ताटाचा, पक्षाचा, कुणाचा जवळचा कार्यकर्ता किंवा लांबचा कार्यकर्ता आहे, कोणाबरोबर फोटो आहेत, हे असले काही बघू नका.”

शस्त्र परवाना दिलेला नाही

सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर केल्याच्या दाव्यावर अजित पवारांनी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, “मला सांगितलं, काही लोकांनी शिफारस केलेली असली तरी शस्त्र परवाना दिलेला नाही, असं स्वतः आयुक्तांनी मला सांगितलं आहे.”

मुख्यमंत्र्यांचीही तीच भूमिका

पुण्याचा असो किंवा महाराष्ट्रातील असो, कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवणे हे पोलिसांचे महत्त्वाचे काम आहे. यात कोणताही राजकीय हस्तक्षेप कोणाकडूनही होऊ देणार नाही. अजित पवार पुढे म्हणाले, “मी दोन दिवस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे तिघे एकत्र होतो (पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे). त्यावेळी देखील हा विषय निघाला होता. मुख्यमंत्र्यांनी देखील हीच भूमिका घेतली आहे, अजिबात कोणाची फिकीर करायची नाही, ज्यांनी चुका केलेल्या असतील त्यांच्यावर कारवाई करायची.”

या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर पुढची कारवाई केली जाईल, असे आश्वासन अजित पवारांनी दिले.

‘फोटो म्हणजे संबंध नाही’

शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे निलेश घायवळसोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “कोण काय म्हणतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अनेकांबरोबर लोक फोटो काढतात, आपल्याला महिती नसतं कोण काय असतं. मोबाईलने सेल्फी काढले जातात, फोटो असले म्हणजे संबंध असतात असे नाही.”

चौकशी करताना फोन, संभाषण, किंवा इतर पुरावे मिळाले तरच कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “माझा एवढेच मत आहे, अन्याय झाला तर मी तुमच्याकरता सर्वस्व पणाला लावेन, पण तुमचे हात बरबटले असले तर तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही,” असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago