महाराष्ट्रनाशिक

Ajit Pawar Jan Sanman Yatra : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जनसन्मान यात्रेला नाशिक मधून सुरुवात..

Ajit Pawar Kicks Off Jan Samman Yatra in Nashik : गुलाबी रंगाची थीम,गीत राष्ट्रवादी, सन्मान महाराष्ट्रवादी!…आलंय राष्ट्रवादीचं नवं गाणं

नाशिक :- विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) तारखा येथे काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते तत्पूर्वी राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरुवात केली आहे. ठाकरे गट काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची जागावाटपसंदर्भात चर्चा चालू आहे. तर भाजपाकडून गट बांधणी चालू आहे. सरकारच्या योजना आणि अडीच वर्षाच्या कालावधीत केलेले कामे सर्वसामान्यापर्यंत पोहोचावे. अजित पवार Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने NCP नाशिकमधून जनसन्मान यात्रेला सुरुवात केली असून यामध्ये गुलाबी रंगाच्या थीमवर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात्रेसाठी वापरण्यात आलेल्या बसचाही रंग गुलाबी आहे. तसेच यानिमित्त पक्षाकडून एक खास गीतही प्रदर्शित करण्यात आले आहे. विधानसभेच्या पूर्वी आपल्या पक्षाचा प्रचार व्हावा. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आता जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आजपासून पक्षाच्या जनसन्मान यात्रेला Ajit Pawar Started Jan Sanman Yatra सुरुवात झाली आहे. Maharashtra Political Latest News

विरोधकांना जे योग्य वाटते ते त्यांनी करावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक ते दिंडोरी असा बसमधून प्रवास करत असताना एएनआयशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, सरकारने जाहीर केलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यानिमित्त आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघांत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच विरोधकांना जे योग्य वाटते ते त्यांनी करावे, आम्हाला जे योग्य वाटते ते आम्ही करत करणार”, असे अजितदादा म्हणाले. Maharashtra Political Latest News

आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले, विरोधकांकडून भूमिका मांडली जाते. त्याबद्दल विरोध असण्याचा कारण नाही. आम्हीही आमचे म्हणणे मांडत असतो. वेळोवेळी निर्णय घेतले गेले. मात्र कोर्टात ते निर्णय टिकले नाही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे आरक्षण देताना इतरांची नाराजी राहू नये यासाठी आम्ही काम करत आहोत, आम्हाला कोणावरही अन्याय करायचा नाही. सर्व घटकांना आम्हाला पुढे घेऊन जायचे आहे. छत्रपती शिवरायांनीही सर्व जातींना सोबत घेऊनच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. तोच विचार आम्ही पुढे नेत आहोत”, असे अजित पवार म्हणाले. Maharashtra Political Latest News

यात्रेनिमित्त अजित पवार गटाकडून एक गीत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. जन सन्मान-दादांचा वादा. ज्याच्या भावना आता या राष्ट्रवादी गीताच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात गुंजतील असे कॅप्शन ट्विटवर हे गीत पोस्ट करत देण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सगळे मंत्री, आमदार, पदाधिकार्यांच्या उपस्थितीत दिंडोरीतून या यात्रेची सुरुवात होणार आहे. Maharashtra Political Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0