Ajit Pawar : मी इथे उभा आहे…’, एनडीएला पाठिंबा देताना अजित पवार पंतप्रधान मोदींसमोर काय म्हणाले?
•राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष अजित पवार यांनी NDA संसदीय पक्षाचे नेते म्हणून पंतप्रधान मोदींच्या नावाचे समर्थन केले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला आहे.
ANI :- उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) बैठकीला हजेरी लावली. यावेळी त्यांनी एनडीएचे नेते म्हणून पंतप्रधान मोदींच्या नावाच्या प्रस्तावाचे समर्थन केले.जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान मोदींसोबत व्यासपीठावर उपस्थित असलेले अजित पवार म्हणाले, “आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक प्रस्ताव ठेवला आहे. त्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी मी येथे उभा आहे. एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला माझा पाठिंबा आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी लोकसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि भाजपचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. एनडीएच्या या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेची युती फेव्हिकॉलसारखी आहे. महाराष्ट्रात भाजप, एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवस्नान आणि अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती आहे.