•Ajit Pawar To Vaibhavi Deshmukh महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या वैभवी देशमुखचे कौतुक झाले आहे. वैभवी देशमुखचे वडील संतोष यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
मुंबई :- महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावी (एचएससी) परीक्षेच्या निकालानंतर, संपूर्ण राज्यात एकाच नावाची चर्चा सुरू आहे – वैभवी देशमुख. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील रहिवासी वैभवी केवळ तिच्या मेहनतीमुळे आणि यशामुळे चर्चेत नाही तर तिची कहाणी लोकांच्या हृदयालाही स्पर्शून गेली आहे. वडिलांच्या निर्गुण हत्यानंतरही वैभवी देशमुख हिला बारावीच्या परीक्षेत सायन्स विभागातून 85.33 टक्के गुण मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैभवी देशमुख हिला पत्राद्वारे शुभेच्छा देत फोटोवर अभिनंदन केले आहे त्यानंतर राज्यातील प्रमुख नेत्यांनी तिच्या अभिनंदन केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैभवी हिचे अभिनंदन केले आहे.
अजित पवार म्हणाले की,बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत इयत्ता बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून 85.33 टक्के गूण मिळवले. तिच्या या यशाबद्दल मी तिचे मनापासून अभिनंदन करतो. वैभवीच्या हुशारी, धैर्य, संयम आणि जिद्दीने संपूर्ण महाराष्ट्राला आनंदित केलं आहे.
अजित पवार आपल्या पत्रात म्हणाले की,इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत विज्ञान शाखेत 85.33 टक्के गुण मिळवून तू उत्तीर्ण झाल्याचे समजून माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला आहे. तू संपादन केलेल्या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
वडील स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर अत्यंत दुःखद, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात मिळवलेलं यश तूझ्या अंगभूत गुणांचं, हुशारीचं, धैर्याचं, संयमाचं, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडवणारं आहे. तूझ्या यशातून राज्यातील इतर विद्यार्थ्यांना लढण्याची, यशस्वी होण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आहे. तूझ्या यशानं वडील स्वर्गीय संतोष देशमुख यांना खुप आनंद झाला असता, ते आज आपल्यासोबत नसले तरी तितकाच आनंद महाराष्ट्र आज अनुभवत आहे. तुझ्या कष्टांना, जिद्दीला सलाम. यापुढेही शैक्षणिक कारकिर्दीत, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तूला असंच यश मिळत राहो, आम्ही सर्व कायमच तूझ्यासोबत आहोत. इयत्ता बारावी परीक्षेतील यशाबद्दल पुनःश्च अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…