Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकोट किल्ल्याची पाहणी केली
Ajit Pawar Visit Sindhu Durga Chhatrapati Shivaji Maharaj Statue: महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागितली आहे ; उपमुख्यमंत्री अजित पवार
सिंधुदुर्ग :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्यानंतर घटनास्थळीची पाहणी केली. यावेळी अजित पवार यांनी घटनेतील दोषंवर कडक कारवाई करण्याचे आश्वासनही दिले आहे. तसेच अजित पवार यांनी महाराष्ट्रातील टेराकोटी जनतेची माफी देखील मागितली आहे.या प्रकरणी हे नेव्ही किंवा PWD ने केले हा वाद घालून काही फायदा नाही. याता पुन्हा याठिकाणी महाराजांचा मजबूत आणि भक्कम असा पुतळा झाला पाहिजे, त्याकडे सरकारने लक्ष घालते आहे.तर याच ठिकाणी शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारण्याचा निर्णय झाला, असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, आमच्यासहित सर्वच राजकीय पक्षांनी तारतम्य ठेवले पाहिजे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात काहीही करू नये, ही आपली संस्कृती नाही, राज्याची संस्कृती जी आहे ती सर्वांनी डोळ्यांसमोर ठेवून वागले पाहिजे, असे अजित पवारांनी म्हटले आहे. संपूर्ण प्रकरणाची बारकाईने चौकशी आणि तपास सुरू आहे जो कुणी गुन्हेगार आहेत ते पळून-पळून कुठे जातील, देशाच्या बाहेर तर जाणार नाही.
राजकोट किल्ल्याची पाहाणी केल्यानंतर अजित पवारांनी ट्विटर हँडलवरुन ट्वीट केले आहे. त्यामध्ये अजित पवार म्हणाले की,मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वी घडली. आज घटनास्थळी भेट दिली, आढावा घेतला. किल्ल्याची देखील पाहणी केली. शिवराय आपला स्वाभिमान आहेत, आपली अस्मिता आहेत. याठिकाणी लवकरच महाराजांचा मजबूत आणि भक्कम असा पुतळा पुन्हा एकदा मानानं उभा राहील, असा शब्द देतो.