Ajit Pawar And His Family Meet PM Modi : नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी घेतली भेट
नवी दिल्ली :– राज्यात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीकडून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार Ajit Pawar आणि एकनाथ शिंदे Eknath Shinde यांचे निवड करण्यात आली आहे. आमदारांच्या शपथविधीच्या कार्यक्रमानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार हा रखडला असून मागील दोन ते तीन दिवसांपासून अजित पवार आपल्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दिल्ली ठाण मानून बसले आहे. अजित पवार यांनी काल काका शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अजित पवार आपल्या सहकुटुंब देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान अजित पवार यांची पत्नी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आणि पुत्र पार्थ पवार हे देखील यावेळी उपस्थित होते. अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून जवळपास अर्धा तास चर्चा केल्याचे म्हटले आहे.
राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला असून शनिवारी 14 डिसेंबरला विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचे खाते मिळावे याकरिता अजित पवार यांनी मागील तीन ते चार दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसले आहे. अजित पवार अर्थमंत्री आणि गृह खात्यावर दावा करत असल्याचे सर्वत्र चर्चा आहे. 16 डिसेंबर पासून महायुती सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पाडणार आहे त्यापूर्वी मंत्रिमंडळाकरिता विस्तार व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून दिल्ली वारी करण्यात येत आहे.