मुंबई

Ajit Pawar : ‘अमेडिया’ जमीन विक्री प्रकरण: अजित पवारांनी खापर फोडले अधिकाऱ्यांवर!

Ajit Pawar On Pune Land Scam : “अधिकाऱ्यांनी भूमिका घेतली असती, तर प्रकार घडला नसता,” पुण्यात पार्थ पवारांच्या कंपनीच्या व्यवहारावर उपमुख्यमंत्र्यांचे विधान; प्रमुख कुलमुखत्यारधार शीतल तेजवानी अटकेत

पुणे :- उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील 40 एकर जमीन विक्री प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) प्रमुख अधिकारपत्रधारक शीतल तेजवानीला अटक केली आहे. याशिवाय तहसीलदार सूर्यकांत येवले आणि ‘अमेडिया’ कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पार्थ पवारांवर कारवाई न झाल्याने विरोधकांनी टीका केली असतानाच, अजित पवार यांनी या जमीन व्यवहार प्रकरणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

अजित पवारांचे विधान

शुक्रवारी विधानसभेत मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाचे एक विधेयक पारित करण्यात आले. या विधेयकात आता नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील तक्रारी कोर्टात न जाता थेट मंत्र्यांकडे सुनावणीसाठी येणार आहेत. हे विधेयक पार्थ पवारांना वाचवण्यासाठी आणले का, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

त्यांनी अनौपचारिक चर्चेत म्हटले

“या प्रकरणी व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणे आणि चुकीच्या बाबी असल्याचे लक्षात आल्यानंतर भूमिका घेणे अपेक्षित होते. अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली असती तर पुढील प्रकार घडला नसता.”
या विधानामुळे पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाचे खापर अजित पवार यांनी थेट अधिकाऱ्यांवर फोडल्याचे दिसून येत आहे.

कारवाई आणि गुन्हे

‘अमेडिया’ कंपनीच्या जमीन विक्री प्रकरणात प्रमुख कुलमुखत्यारधार शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तर तहसीलदार सूर्यकांत येवले आणि कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

vivek

Recent Posts