
Uddhav Thackeray On Eknath Shinde : मातोश्रीवर शिवसेनेत येणाऱ्यांची गर्दी वाढत असल्याचा दावा; ‘सत्तेसाठी लाचारी’ म्हणत शिंदे गटावर टीकास्त्र
मुंबई: 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या मोठ्या फुटीनंतर आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर, आता नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. 29¹9 मध्ये भाजपनेच दगाबाजी केली होती, असे त्यांनी म्हटले आहे.
‘दिशाभूल झालेले परत येत आहेत’
उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला.
मातोश्रीवर गर्दी: “मागचे काही दिवस तुम्ही पाहात आहात की मातोश्रीवर रोजच शिवसेनेत येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यात सर्वच आहेत. इतर पक्षातले लोक आहेत, भाजपातलेही लोक येत आहेत. शिवसेनेतून दिशाभूल झालेलेही परत आले आहेत.”
धुळफेक स्पष्ट: “जी धुळफेक होती, ती आता स्पष्ट व्हायला लागली आहे,” असे ते म्हणाल.
सोनिया गांधींच्या फोटोवरून टीका
एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी त्यांना लक्ष्य केले. गद्दारी करताना काँग्रेससोबत गेल्याचे कारण दिले जात होते, पण आज चित्र वेगळे आहे, असे ते म्हणाले.
गद्दारीचे कारण आणि आजचे वास्तव:,’
“गद्दारी करताना कारण काय दिलं? उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले. काँग्रेससह गेले म्हणून आम्ही युती तोडली. मात्र, आता नगरपरिषदेच्या ज्या निवडणुका चालल्या आहेत, त्यात तुम्ही पाहिलं असेल की जे मला शिव्या घालत होते, त्यांच्या पोस्टरवर सोनिया गांधींचा फोटो आहे. आनंद दिघेंचा फोटो आणि बाजूला सोनिया गांधी.”
सत्तेसाठी लाचारी: “ही सगळी सत्तेसाठीची लाचारी आहे,” अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटावर टीका केली.
भाजपचा दुटप्पीपणा: भाजपने थेट सांगितले आहे की, राजकारणात नंबर एकलाच महत्त्व असते, क्रमांक 2 चा पक्ष वगैरे नसतोच. ठाण्यात शिवसेनेचा दरारा होता, पण आता भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत असतानाही हे (शिंदे गट) काही बोलू शकत नाहीत, असेही ठाकरे म्हणाले.
आपल्याकडे जी मशाल आहे ती हिंदुत्वाची, भगव्या रंगाची आणि मराठी माणसाची मशाल आहे, ती घेऊन पुढे चला, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. निवडणूक आयोग आणि न्यायालय यांच्यावर अधिक बोलणे त्यांनी टाळले.


