Ajit Pawar On Solapur Lady Officer Viral Video Call : व्हायरल व्हिडिओवर दिलं उत्तर; कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता, उपमुख्यमंत्री म्हणतात
पुणे :- सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे अवैध उत्खननावर कारवाई करणाऱ्या एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून दम दिल्याचा व्हायरल व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. अखेर आता अजित पवार यांनी यावर मौन सोडत आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले आहे.
अजित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ (X) हँडलवर एक पोस्ट करून आपली बाजू मांडली आहे. “मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता,” असे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले की, “सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता.”
आपल्या पोलीस दलाबद्दल आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल आपल्याला सर्वोच्च आदर असल्याचे त्यांनी सांगितले. “माझ्यासाठी कायद्याचे राज्य हेच सर्वात महत्त्वाचे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकरण काय होते?
सोलापुरातील माढा येथे मुरुमाच्या अवैध उत्खननाविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकारी अंजना कृष्णा गेल्या होत्या. त्यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना फोन केला. त्या फोनवरून अजित पवार यांनी अधिकाऱ्याला, “मी उपमुख्यमंत्री बोलतोय, मी तुम्हाला आदेश देतो की, कारवाई रोखा,” असे सांगितले.
अधिकाऱ्याने आपल्या फोनवर थेट कॉल न केल्याबद्दल विचारणा केली, तेव्हा अजित पवार संतापले. “तुमची एवढी हिंमत झाली का?” असे म्हणत त्यांनी थेट व्हिडिओ कॉल करून कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते. या घटनेमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र आता अजित पवारांच्या या स्पष्टीकरणानंतर हा वाद शांत होण्याची शक्यता आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…