पुणे
Trending

Ajit Pawar : “अजित पवारांनी स्वतःच्या पक्षाकडे पाहावे, आम्ही तोंड उघडले तर अडचण होईल!”; रवींद्र चव्हाणांचा ‘दादां’ना इशारा

Ajit Pawar On Ravindra Chavan : पिंपरीतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून महायुतीत ठिणगी; ‘मोदी-फडणवीस’ यांच्या नेतृत्वाचा चव्हाणांकडून बचाव

पुणे :- पिंपरी-चिंचवडमध्ये PCMC Election अजित पवारांनी Ajit Pawar भाजपच्या सात वर्षांच्या सत्ताकाळातील भ्रष्टाचाराचे वाभाडे काढल्यानंतर, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पवारांना सुनावले. “अजित पवार ज्या पक्षाबद्दल बोलत आहेत, तो पक्ष नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आहे हे त्यांनी विसरू नये. आरोप-प्रत्यारोप करताना त्यांनी मर्यादा पाळली पाहिजे. आम्ही जर त्यांचे जुने हिशोब काढायला बसलो आणि आरोप केले, तर त्यांना मोठी अडचण निर्माण होईल,” अशा शब्दांत चव्हाणांनी पवारांना सावधानतेचा इशारा दिला.

पुण्याच्या विकासाचा आणि मेट्रोचा मुद्दा

पुण्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना चव्हाण यांनी विकासाच्या मुद्द्यावर भर दिला. “पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या जनतेला दर्जेदार नागरी सुविधा कोण देऊ शकते, हा खरा प्रश्न आहे. महाविकास आघाडीच्या काळात पुण्यात मेट्रोचा प्रकल्प रखडला होता. त्यांना हे काम पूर्ण करायची इच्छा नव्हती. मात्र, केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस सरकार आल्यानंतर पुण्यात 33 किलोमीटरचे मेट्रोचे जाळे विणले गेले,” असा दावा त्यांनी केला. पायाभूत प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी देऊन भाजप सरकारने गतीमान कामाचे उदाहरण सेट केल्याचेही त्यांनी नमूद केले.

महायुतीतील संघर्षाने रंगात आली निवडणूक

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या या निवडणुका आता अत्यंत चुरशीच्या वळणावर आल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांनी घेतलेला आक्रमक पवित्रा आणि त्याला रवींद्र चव्हाण यांनी दिलेले तिखट प्रत्युत्तर यामुळे महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाटावर आला आहे. “यंदाची निवडणूक ही केवळ पुण्याच्या विकासासाठी असून जनता नागरी सुविधांना महत्त्व देईल,” असा विश्वास चव्हाणांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0