•Nawab Malik On BJP : 94 जागांवर स्वतंत्र लढत; बांग्लादेशी मतदारांच्या मुद्द्यावरून नवाब मलिकांचा भाजपवर पलटवार
मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. वानखेडे स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात पक्षाने 700 चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी, धूळमुक्त मुंबई आणि भटक्या श्वानांचा बंदोबस्त ही तीन मुख्य ‘वचन हमी’ दिली आहे.
सर्वसमावेशक उमेदवारीचा दावा
यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत 94 जागांवर स्वतंत्रपणे लढत आहे. उमेदवारी देताना सर्व जाती-धर्माच्या लोकांचा विचार करण्यात आला असून, 56 मराठी भाषिक, 21 उत्तर भारतीय, 24 मुस्लिम आणि 3 ख्रिश्चन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे 50 महिला उमेदवारांना रिंगणात उतरवून पक्षाने महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे.
नवाब मलिकांचा भाजपवर प्रहार
मुंबईत मोठ्या संख्येने बांग्लादेशी मतदार असल्याच्या भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या आरोपाचा नवाब मलिक यांनी खरपूस समाचार घेतला. “भाजपा प्रत्येक निवडणुकीत हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी बांग्लादेशींचा बागुलबुवा उभा करते. जर त्यांना इतकाच त्रास असेल तर त्यांनी प्रथम बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारतातून बाहेर काढावे,” असा टोला मलिकांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जाहीरनामा
500 किमी नवे रस्ते बांधणार. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सीसीटीव्ही, वायफाय आणि डिजिटल सेवांचा विस्तार. नव्या रोजगार केंद्रांची निर्मिती, एआय चलित नियंत्रण केंद्रासह स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल यंत्रणांची उभारणी. अंतर्गत रस्त्यांचे जाळे खुले करुन रहदारीवर नियंत्रण.
जुन्या चाळी आणि झोपडपट्टीमध्ये मोफत पाणी पुरवठा. 24×7 स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा. पाणी गळती रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान.
2030 पर्यंत ‘स्मार्ट वॉटर मिटर’ द्वारे जलसाक्षर वॉर्ड मिशन राबवणार.
प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी.
नाले आणि नद्या स्वच्छ करण्यासाठी ‘नदी पुनरुज्जीवन’ अभियान.
अतिवृष्टी पूर नियंत्रणासाठी नवी मलजल वाहिन्यांमध्ये सुधारणा.
घनकचरा कराची प्रभावी आखणी.
कचरा क्रेडीट प्रमाणपत्र प्रणाली राबवणार, सफाई कामगारांना लाड-पागे समितीच्या धोरणानुसार मोफत घरे आणि आरोग्य विमा.
प्रत्येक वॉर्डात प्रगत प्राथमिक आरोग्य केंद्र. प्रत्येक रुग्णालयातील अत्याधुनिक ‘डॅशबोर्ड’ प्रणाली उभारणार. टेली कन्सल्टींग सुविधांसह मनपा रुग्णालयाचे 24×7 आरोग्य कल्याण केंद्रामध्ये रुपांतर. मनपा शाळेत विद्यार्थ्यांना ‘हेल्थकार्ड’.
भटक्या श्वानांचा प्रभावी बंदोबस्त आणि पाळीव श्वानांच्या परवान्यांची प्रभावी अमंलबजावणी.
मुंबईला ग्रीन सिटी बनवण्यासाठी 10 लाख झाडे लागवड. प्रदूषण नियंत्रणासाठी इलेक्ट्रिक बस आणि सीएनजी वाहनांना प्रोत्साहन. हवा गुणवत्ता मॉनिटरींग सिस्टम, जलवायू बदलाशी लढण्यासाठी ‘क्लायमेट रेझिलिएट मुंबई’ योजना. धुळमुक्त मुंबईसाठी आधुनिक यंत्र सामग्रीचा वापर.
एक लाख नव्या घरांची निर्मिती. एसआरए योजनेची वेगवान अंमलबजावणी. 700 चौ. फुटांपर्यंत मालमत्ता करमाफी. नोकरीतील महिलांसाठी वसतीगृहांची उभारणी.
ऑलिम्पिक दर्जाचे स्टेडियम आणि युवा क्लब. नागरिकांच्या तक्रारींसाठी 24×7 हेल्पलाईन. ई-गव्हर्नसन्सद्वारे सर्व सेवा ऑनलाइन, भ्रष्टाचारमुक्त मनपा प्रशासन.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…