मुंबई

Ajit Pawar : अजित पवार अपघात प्रकरण: “शवविच्छेदन सुरू असतानाच कंपनीला क्लीन चिट!”; रोहित पवारांचा ‘DGCA’ आणि केंद्रीय मंत्र्यांवर गंभीर आरोप

Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28 जानेवारीचा तो ‘घाईघाईतील’ अहवाल संशयाच्या भोवऱ्यात | “हा घातपातच”, अमोल मिटकरींचाही इशारा

मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या विमान अपघाताचा छडा लावण्यासाठी आता रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे दोन तरुण नेते एकत्र आले आहेत. “अजितदादांचे पार्थिव रुग्णालयात असताना आणि बारामतीत त्यांचे शवविच्छेदन सुरू असतानाच, दिल्लीत डीजीसीएने व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी पहिला अहवाल तयार केला होता,” असा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

नेमका आरोप काय?

रोहित पवार यांनी 28 जानेवारीच्या घटनाक्रमाचा दाखला देत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली:

तप्तरता की कट?: ज्या दिवशी अपघात झाला, त्याच दिवशी दुपारी 1 वाजून 36 मिनिटांनी डीजीसीएने आपला पहिला अहवाल दिला. एका बाजूला पोस्टमार्टम सुरू होते आणि दुसरीकडे दिल्लीत व्हीएसआर कंपनीच्या विमानाचे ऑडिट फेब्रुवारीत झाले असून त्यात कोणतीही त्रुटी (Level-1) नसल्याचे घोषित करण्यात आले.

केंद्रीय मंत्र्यांची भूमिका: केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांनीदेखील 28 जानेवारीलाच विमानातील सुरक्षेच्या त्रुटी आणि वैमानिकाच्या बाबतीत कंपनीला क्लीन चिट दिली होती. इतक्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाला असताना चौकशी पूर्ण होण्याआधीच हे सर्टिफिकेट कशासाठी? असा सवाल रोहित पवारांनी विचारला आहे.

डीजीसीएचा नवा अहवाल: ‘नखाएवढं’ यश

काल डीजीसीएने सादर केलेल्या स्पेशल ऑडिट अहवालात विमानात त्रुटी असल्याचे मान्य केले आहे. ‘एअर वर्दीनेस’ प्रमाणपत्र, एअर सेफ्टी आणि फ्लाईट ऑपरेशनमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. मात्र, रोहित पवार यांच्या मते हा अहवाल म्हणजे केवळ पळवाट आहे. “तुमच्या हलगर्जीपणामुळे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असलेला आमचा मोठा नेता गेला,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

आता लढा कायदेशीर; एफआयआर (FIR) साठी आग्रही

रोहित पवार यांनी या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. “आज आम्ही मुंबईत डीजीसीएविरोधात एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर इथे गुन्हा दाखल झाला नाही, तर उद्या बारामतीला जाऊन पोलीस निरीक्षकासमोर (PI) उपोषणाला बसू, पण गुन्हा दाखल केल्याशिवाय हटणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

अमोल मिटकरींचा थेट इशारा

याच विषयावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही आक्रमक भूमिका घेतली. “डीजीसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला आहे. वैमानिकाबाबतचे सत्य जर समोर आणले नाही, तर महाराष्ट्र तुम्हाला जिवंत ठेवणार नाही,” असा थेट इशारा त्यांनी यंत्रणेला दिला आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

12 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

12 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

18 hours ago

Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘जमीन घोटाळ्या’चा स्फोट! अंबादास दानवेंचा 1150 कोटींचा आरोप, तर भुमरेंचा अब्रुनुकसानीचा सणसणीत इशारा

•जन्माच्या 14 वर्षे आधीच झाला जमिनीचा व्यवहार? | 'हिबानामा'च्या तांत्रिक मुद्द्यावरून दानवेंचा भुमरेंवर प्रहार |…

18 hours ago