मुंबई

Ajit Pawar : कृषी मंत्री कोकाटेंना अजित पवारांची ‘फटका’! राजीनाम्याची शक्यता वाढली

Ajit Pawar On Manikrao Kokate : रमी खेळण्यावरुन आणि ‘सरकार भिकारी’ वक्तव्यावरुन अजित पवार संतापले; 15 मिनिटांहून अधिक काळ चालली कानउघडणी

मुंबई :- महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे Manikrao Kokate यांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जोरदार ‘फटका’ बसला. मंत्रालय स्थित अजित पवार Ajit Pawar यांच्या दालनात झालेल्या 15 मिनिटांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेत अजित पवारांनी कोकाटेंवर नाराजगी व्यक्त करत संयमाने बोलण्याचा सल्ला दिला आणि त्यांची चांगलीच कानउघडणी केली. या घटनेमुळे कोकाटेंच्या राजीनाम्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या काही दिवसांपासून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनादरम्यान, कोकाटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ते विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर रमी गेम खेळताना दिसले होते. याशिवाय, त्यांनी सरकारबद्दल “सरकार भिकारी आहे” असे वादग्रस्त विधानही केले होते, ज्यामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती आणि सरकारचीही कोंडी झाली होती.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीत अजित पवारांनी कोकाटेंना स्पष्ट शब्दांत त्यांची चूक दाखवून दिली आणि भविष्यकाळात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची ताकीद दिली. कोकाटे यांनीही आपल्या चुकांबद्दल खेद व्यक्त करत, यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची ग्वाही अजित पवारांना दिली.

या महत्त्वपूर्ण भेटीनंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भवितव्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यांच्या राजीनाम्याची शक्यता पुन्हा एकदा वाढली आहे. तसेच, कृषी मंत्री म्हणून त्यांचा विभाग बदलला जाण्याचीही चर्चा सुरू आहे. सूत्रांनुसार, कृषी विभाग राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधीलच मंत्री मकरंद पाटील यांना दिला जाऊ शकतो, तर त्यांच्याकडील राहत आणि पुनर्वसन विभाग कोकाटेंना दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

vivek

Recent Posts