•अकोल्यात भरधाव रुग्णवाहिकेची ताफ्यातील गाडीला जोरदार धडक,पोलिसांची तत्काळ कारवाई, चालक ताब्यात; पवारांचा दौरा यथावत
अकोला | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अकोला दौरा थोडक्यात थांबला असता! विमानतळावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेल्या त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाला भरधाव वेगातील रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली. या अचानक घडलेल्या घटनेमुळे ताफ्यात क्षणभर अफरातफरीचं वातावरण निर्माण झालं.
अपघात इतका जोरदार होता की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, मोठं सुदैव म्हणजे कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिकेच्या चालकाला ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी पोलिस मुख्यालयात नेण्यात आलं.
या अपघाताचा आणखी एक भावनिक पैलू म्हणजे, जिथे ही धडक झाली त्या परिसरातच काही वर्षांपूर्वी माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा गंभीर अपघात झाला होता. त्यामुळे आजच्या घटनेनं त्या भयावह आठवणी पुन्हा जाग्या केल्या.
दरम्यान, अजित पवार यांनी या प्रकारानंतरही दौरा रद्द न करता, नियोजित अकोला व वाशीम जिल्ह्यांचा आढावा घेतला आणि खामगाव येथील पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी प्रस्थान केलं. या वेळी आमदार रणधीर सावरकर, अमोल मिटकरी, संजय खोडके, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड आणि पोलीस अधीक्षक अर्जित चांडक आदी मान्यवर उपस्थित होते.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…