मुंबई

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगड दौऱ्यावर, अमित शहांचे सुनील तटकरेंच्या निवासस्थानी स्नेहभोजन

•Amit Shah Raigad Tour केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी (12 एप्रिल) रायगड दौऱ्यावर

मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या शनिवारी 12 एप्रिल रोजी रायगड दौऱ्यावर येणार आहे.राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या रोह्यातील निवासस्थानी भेट देणार आहे. तसेच स्नेहभोजनही करणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी रायगड किल्ल्यावर येणार आहेत. येथील कार्यक्रम संपल्यावर ते खासदार सुनील तटकरे यांच्या रोहा तालुक्यातील सुतारवाडी निवासस्थानी भेट देणार आहेत.या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी घरी येण्याचे दिलेले निमंत्रण अमित शहा यांनी स्वीकारल्याने शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. कारण रायगड जिल्हा पालकमंत्र्यांचा प्रश्न अद्यापही सुटला नसून कदाचित अमित शहा यांच्या भेटीनंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सोडणार असल्याची चर्चा बोलली जात आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्हा पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेले शिंदे गटाचे मंत्री आणि स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी अनेक वेळा इच्छा व्यक्त केली असून तटकरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अमित शहा यांच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमामुळे शिंदे गटात अस्वस्थता दिसून येत असल्याची चर्चा रायगड जिल्ह्यात चालू आहे.

आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण शिंदे यांनी नवी दिल्लीत तक्रार केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या 24 तासांत त्याला स्थगिती दिली होती.

सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचे ट्विट

कितीही मोठा घोटाळा करा, काही प्रॉब्लम नाही.

72,000 कोटी चा सिंचन घोटाळा आठवतो का ? त्याचे पुढे काय झाले ? काहीच नाही ना ? कारण आपलं थर्ड क्लास राजकारण.

घोटाळ्याची चौकशी कधीच करायची नव्हती. फक्त धमकी देऊन, महाराष्ट्रात सत्ता आणायची होती.

आता त्याच तटकरेंच्या घरी गृहमंत्री जेवायला जाणार ?

अतिउत्तम !

ED आणि ACB आता गुंडाळून टाका

youtu.be/Nnmnro0UpCM?si…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0