Ajit Pawar : पुण्यात पाण्याची टाकी कोसळून 4 मजुरांचा मृत्यू, 7 जखमी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले शोक
•अजित पवार म्हणाले की, या अपघातानंतर पाच ते सात मजूर टाकीखाली अडकल्याची भीती आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.
पुणे :- पुण्यात पाण्याची टाकी फुटून चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. सात जण गंभीर जखमी, कामगार अंघोळ करत होते. त्यावेळी ही घटना घडली. तीन दिवसांपूर्वीच टाकी बांधण्यात आली. टाकीचे मजबुतीकरण करण्यापूर्वी तीस हजार लिटर पाणी भरले होते.पाण्याच्या दाबाने टाकी फुटल्याचे तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर तणाव पसरला.
पोलिस, एसआरपीएफ आणि अग्निशमन दल तसेच महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. इथे मजूर कुठून आले? लेबर कॅम्प कोणी बांधले? कामगार कंत्राटदार कोण आहेत? सध्या पोलीस त्याचा तपास करत आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिली.मृत व गंभीर जखमी मजुरांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
अजित पवार यांनी दुख व्यक्त करत म्हणाले की,भोसरीच्या सद्गुरू नगर परिसरातील पाण्याची टाकी कोसळून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे. मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुर्घटनेत पाच ते सात कामगार टाकीखाली अडकल्याची भीती आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी माहिती घेतली जात असून आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत.