•Airport Bomb Threat देशातील चार विमानतळांवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला आहे. मुंबई, पाटणा, वडोदरा आणि जयपूर ही विमानतळे आहेत. धमकीचा ईमेल आल्यानंतर चारही विमानतळांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
ANI :- देशातील चार विमानतळांवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला आहे. मुंबई, पाटणा, वडोदरा आणि जयपूर ही विमानतळे आहेत. धमकीचा ईमेल आल्यानंतर चारही विमानतळांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सुरक्षा एजन्सी या मेलची चौकशी करत आहेत आणि हा ईमेल कुठून पाठवला गेला आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर चारही विमानतळांवर सुरक्षा यंत्रणांकडूनही तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे, जेणेकरून काही संशयास्पद वस्तू आढळल्यास तत्काळ कारवाई करता येईल.
मुंबई विमानतळाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देशातील अनेक विमानतळांना धमकीचे ईमेल आले आहेत. त्यात मुंबई विमानतळही आहे. ईमेल मिळाल्यानंतर येथील सीआयएसएफ टीम सतर्क झाली. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची कडक तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचीही तपासणी करण्यात आली, जेणेकरून कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास ती तत्काळ नष्ट करता येईल.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…