देश-विदेश

Air India Plane : टेकऑफनंतर 30 सेकंदातच थांबले इंजिन; एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल समोर

Air India Plane Latest News : कॉकपिटमधील संवाद उघड – ‘तू इंधन पुरवठा का बंद केलास?’ वैमानिकाचे धक्कादायक प्रश्नोत्तर

ANI :- अहमदाबाद विमानतळावर 12 जून रोजी घडलेल्या भीषण एअर इंडिया विमान Air India Plane दुर्घटनेच्या प्राथमिक तपास अहवालाने अनेक गंभीर बाबी उघड केल्या आहेत. भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने (AAIB) सादर केलेल्या या अहवालानुसार, उड्डाण घेतल्याच्या काही सेकंदांतच विमानाची दोन्ही इंजिने अचानक बंद पडली होती. यामागचे कारण म्हणजे इंधन पुरवठा करणारे स्विचेस ‘रन’ मोडवरून ‘कटऑफ’ मोडवर गेल्याचे समोर आले आहे.

या धक्कादायक घटनाक्रमानंतर कॉकपिटमध्ये झालेला संवादही अहवालात नमूद करण्यात आला आहे. मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांनी सह-वैमानिक क्लाइव्ह कुंदर यांना विचारले की, “तू इंधन पुरवठा का बंद केलास?” यावर कुंदर यांनी उत्तर दिले, “मी काहीही केलेले नाही.” या संवादावरून घडलेला गोंधळ स्पष्टपणे समोर येतो.

दुर्घटनाग्रस्त विमान बोईंग 787-8 प्रकारचे होते व त्यावर GE GEnx-1B इंजिन होते. उड्डाणपूर्वी दोन्ही वैमानिकांनी पुरेसा विश्रांती कालावधी घेतल्याचे आणि त्यांना भरपूर अनुभव असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. सभरवाल यांना 8,600 तासांचा तर कुंदर यांना 1,100 तासांचा उड्डाण अनुभव होता.

अहवालानुसार, टेकऑफनंतर सुमारे 30 सेकंदांतच अपघात झाला. या दुर्घटनेत एकूण 242 प्रवाशांपैकी 241 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या विमान उत्पादक किंवा इंजिन ऑपरेटरवर कोणतीही कारवाई सुचवण्यात आलेली नाही, मात्र पुढील सखोल तपास सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

vivek

Recent Posts