Air India plane crash: 90 वर्षीय वडिलांचा ढसाढसा रडत निरोप; संपूर्ण परिसराचे डोळे झाले पाणावले
मुंबई :- अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान अपघातात प्राण गमावलेल्या कॅप्टन सुमित सभरवाल (वय 56) यांना मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. Air India plane crash त्यांच्या 90 वर्षीय वडिलांनी पार्थिवावर अश्रूंची सुमनांजली अर्पण केली. प्रार्थना करत असतानाच ते फफकून रडू लागले. त्यांच्या मुलीने त्यांना सावरले, पण उपस्थितांमध्ये भावनांचा पूर उसळला.
सभरवाल यांचे पार्थिव आज सकाळी अहमदाबादहून मुंबई विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर पवई येथील जल वायु विहारमध्ये त्यांच्या राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. परिसरातील नागरिक, नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यावसायिक निरंजन हीरानंदानी आणि स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी वैयक्तिकरित्या येऊन श्रद्धांजली अर्पण केली.
नंतर त्यांचे पार्थिव चकला विद्युत स्मशानभूमीकडे नेण्यात आले. सभरवाल हे आपल्या वृद्ध पालकांसोबत मुंबईत राहत होते. 12 जून रोजी लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया (AI-171) विमानाचा गुजरातमधील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत कॅप्टन सभरवाल, फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर आणि विमानातील इतर 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. वैद्यकीय महाविद्यालयात उपस्थित 29 जणांचा देखील जीव गेला.
डीजीसीएच्या माहितीनुसार, कॅप्टन सभरवाल यांना तब्बल 8200 तासांचा उड्डाण अनुभव होता.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…