Air India Plan Accident News : लंडनला निघालेलं विमान टेकऑफदरम्यान कोसळलं; 242 प्रवाशांच्या मृत्यूची भीती
ANI :- गुरुवारी (12 जून) दुपारी गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाइनर 787 प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला. या विमानात 242 प्रवासी होते आणि सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. Air India Plan Accident News मेघाणीनगर भागात या अपघातानंतर आग भडकली आणि प्रचंड काळ्या धुराचे लोट आकाशात झेपावले.
हे विमान लंडनसाठी उड्डाण करत असताना अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ टेकऑफदरम्यान इमारत किंवा भिंतीला धडकून कोसळले. या भीषण अपघातामुळे संपूर्ण विमान छिन्नविछिन्न झाले असून, काही भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
अपघाताचे दृश्य भयावह असून, एका पंख्याचा तुकडा दूरवर कोसळलेला दिसतो. घटनास्थळी अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतली असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिक घाबरून इकडून तिकडे पळू लागले.
प्रभावित इमारतीचेही मोठे नुकसान झाले असून, मदत आणि बचावकार्य अद्याप सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार टेकऑफदरम्यान तांत्रिक बिघाड किंवा संरचनात्मक अडथळा कारणीभूत असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…