मुंबई

Air India Airplane Crash : अहमदाबादहून लंडनकडे जाणारं एअर इंडिया विमान कोसळलं; अपर्णा महाडिकसह 241 प्रवाशांचा मृत्यू

•केबिन क्रू सदस्य अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्या नात्यातील

मुंबई | गुजरातच्या अहमदाबाद शहरात गुरुवारी दुपारी एक भीषण विमान दुर्घटना घडली. एअर इंडिया फ्लाइट AI-171, जो लंडनकडे झेपावला होता, उड्डाण केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत मेघाणी नगर परिसरात कोसळला. या विमानात 12 केबिन क्रू सदस्यांसह एकूण 242 प्रवासी होते. दुर्घटनेत 241 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, केवळ एक जण गंभीर अवस्थेत बचावला आहे.

या अपघातात मृत झालेल्यांमध्ये एअर इंडिया की वरिष्ठ केबिन क्रू सदस्य अपर्णा महाडिक (वय 42) यांचाही समावेश आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि महाराष्ट्र एनसीपीचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या चुलत सून होत्या. तटकरे यांनी स्वतः या दुर्दैवी घटनेची माहिती देताना सांगितले की, “अपर्णा माझ्या लहान बहिणीची सून आहे. त्यांचं कुटुंब गोरेगाव (मुंबई) येथे राहतं.

अपर्णा यांचे पती अमोल तटकरे हेही एअर इंडियात केबिन क्रू म्हणून कार्यरत असून, अपघाताच्या वेळी ते दिल्लीत होते. त्यांना घटनेची माहिती मिळताच ते तातडीने अहमदाबादला रवाना झाले. महाडिक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या ‘बोइंग 787 ड्रीमलाइनर’ विमानाचा काही भाग अहमदाबादच्या बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळला, ज्यामुळे परिसरातही मोठी हानी झाली. सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील डॉक्टर व नर्सिंग स्टाफच्या निवासी इमारतीजवळ ही दुर्घटना घडल्यामुळे आरोग्य सेवकही हादरून गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि नागरी उड्डाण मंत्री सतत परिस्थितीचा आढावा घेत असून, राहत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0