मुंबई

एअर इंडिया AI-171 अपघाताच्या चौकशीला गती : ब्लॅक बॉक्समधून मिळाल्या निर्णायक माहितीच्या धारा

ब्लॅक बॉक्सचं मेमरी मॉड्यूल अखेर डिकोड; एएआयबी पथकाच्या तपासाला वेग

ANI :- 12 जून रोजी दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडिया AI-171 या विमानाच्या अपघातामागील रहस्य उलगडण्याच्या दिशेने मोठा टप्पा पार करण्यात आला आहे. या दुर्घटनेतून सापडलेल्या ब्लॅक बॉक्समधील महत्त्वपूर्ण डेटा अखेर यशस्वीरित्या डिकोड करण्यात आला आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली.

या अपघाताच्या तपासासाठी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने ब्लॅक बॉक्समधील क्रॅश प्रोटेक्शन मेमरी मॉड्यूल 25 जून रोजी डाऊनलोड केले. यामध्ये कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरच्या माध्यमातून वैमानिकांचे संवाद, यंत्रणांची स्थिती, आणि शेवटच्या क्षणी झालेले तांत्रिक बदल टिपले गेले आहेत.

या विश्लेषणाच्या आधारे विमान कोसळण्यामागे तांत्रिक बिघाड कारणीभूत होता की मानवी चूक, याचा अंतिम निर्णय घेता येणार आहे. एटीसी अधिकारी, वैमानिक वैद्यकीय तज्ज्ञ, आणि राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या प्रतिनिधींचा तपास पथकात समावेश आहे.

सरकारच्या मते, या तपासाचा मुख्य उद्देश हवाई सुरक्षेतील त्रुटी ओळखून भविष्यातील अपघात टाळणे हा आहे. संबंधित ब्लॅक बॉक्सला काहीसे नुकसान झालं असतानाही त्यामधील डेटाची सुरक्षित पुनर्प्राप्ती ही तपासातली मोठी कामगिरी ठरत आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago