•भानोदा गावाजवळ घडली दुर्घटना; स्फोटानंतर परिसरात आगीचे लोळ आणि धुराचे लोट
ANI :- राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील भानोदा गावाजवळ आज (बुधवार) दुपारी 12.30 वाजता भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले, अशी धक्कादायक घटना घडली. स्फोटानंतर परिसरात आगीचे लोळ आणि प्रचंड धुराचे लोट दिसून आले. घटनेनंतर काही क्षणांतच आजूबाजूच्या भागात जोरदार आवाज ऐकू आल्याने नागरिक घाबरले.
रतनगड तहसील अंतर्गत येणाऱ्या राजलदेसर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. विमानात दोन वैमानिक उपस्थित होते, अशी माहिती मिळाली असली तरी त्यांची प्रकृती आणि सुरक्षिततेविषयी कोणतीही अधिकृत माहिती हवाई दलाकडून देण्यात आलेली नाही.
चुरू जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जय यादव यांनीही घटनेची पुष्टी केली असून सांगितले की, “घटनेचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. हवाई दलाकडून अधिकृत चौकशी केल्यानंतरच संपूर्ण माहिती स्पष्ट होईल.”दरम्यान, घटनास्थळाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, स्थानिक ग्रामस्थांनी दुर्घटनास्थळी गर्दी केल्याचे त्यातून दिसून येत आहे.
याआधीही, एप्रिल 2025 मध्ये जामनगर (गुजरात) येथे भारतीय हवाई दलाचे जॅग्वार प्रशिक्षण लढाऊ विमान कोसळले होते. त्या दुर्घटनेत एक वैमानिक जग गमावावा लागला होता. अवघ्या तीन महिन्यांत हवाई दलाच्या दोन लढाऊ विमान दुर्घटना घडल्याने विमान सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…