एआयएमआयएम रायगड सचिव हाजी शाहनवाज खान यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनांनंतर केली ही मागणी
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या प्रकरणी संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्याची केली मागणी
नवी मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेला जबाबदार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एआयएमआयएम रायगड नेते हाजी शाहनवाज खान यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून खान यांनी अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर खडक कारवाईची मागणी केली आहे.
एआयएमआयएम रायगड नेते हाजी शाहनवाज खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रात केली ही मागणी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेला जबाबदार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करणेबाबत …..८ महिन्यापूर्वी नौदल दिनाचे औचित्य साधून मालवण येथील राजकोट याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडले. मात्र अवघ्या ८ महिन्यात छत्रपतींचा पुतळा कोसळणे ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं. त्यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावनांना ठेस पोहोचली आहे, भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेतील ठेकेदार, संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येवून त्यांच्यावर कठोरात कठोर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी अप्नाकडे नम्र विनंती आहे.अशी मागणी महाराष्ट्र महासचिव, विद्यार्थी आघाडी सिंधुदुर्ग नेते,एआयएमआयएम हाजी शाहनवाज खान यांनी केली आहे.