•स्थानिक निवडणुकीसाठी स्वगृही परत; गडाख समर्थकांचा विकासाच्या मुद्द्यावर विजय मिळवण्याचा निर्धार
अहमदनगर :- शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी आगामी नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी पक्षाचे अधिकृत चिन्ह ‘मशाल’ बाजूला ठेवून, स्थानिक निवडणुकीत ‘क्रांतिकारी शेतकरी पक्षा’ च्या माध्यमातून उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी मंत्र्यांचा जुना फॉर्म्युला
शंकरराव गडाख यांनी यापूर्वी, 2017 मध्ये अपक्ष असताना क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातूनच निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी त्यांचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले होते. आता त्यांनी पुन्हा याच ‘जुना फॉर्म्युला’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
याआधी, राष्ट्रवादी काँग्रेसमधून (एकत्रित) बाहेर पडल्यानंतर अपक्ष म्हणून विधानसभेत विजयी झालेले आमदार शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता आणि मंत्रिपद मिळवले होते. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते पक्षाच्या चिन्हाऐवजी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
कार्यकर्त्यांची बैठक:
नेवासे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्या, सोमवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत नेवासा शहरातील कार्यकर्त्यांची आज (रविवार) बैठक झाली. या बैठकीला मुळा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुंवर, ॲड. अण्णासाहेब आंबाडे, अण्णासाहेब पठारे आदी उपस्थित होते.
गडाखांचे स्पष्टीकरण:
यावेळी बोलताना माजी मंत्री गडाख यांनी निवडणूक लढवण्याचा उद्देश स्पष्ट केला:
“आगामी नगरपंचायत निवडणूक क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढविण्यात येईल. ही लढाई कोणती व्यक्ती वा पक्षविरोधात नसून, नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आहे.”
सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने आणि शिस्तबद्ध काम करून नगराध्यक्षासह नगरसेवक पदावर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत. नव्या जोमाने व विकासाच्या हेतूने क्रांतिकारी शेतकरी पक्ष निवडणुकीत उतरणार असल्याचे आवाहन त्यांनी केले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…