देश-विदेश
Trending

Ahmedabad Plane Crash Updates : अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमानाचा भीषण अपघात!

Ahmedabad Plane Crash Updates : एअरपोर्ट बंद; पंतप्रधानांनी तातडीची मदत आणि तपासाचे आदेश दिले

ANI :- अहमदाबादहून लंडनला निघालेलं एअर इंडिया फ्लाइट AI-171 गुरुवारी (12 जून 2025) टेकऑफनंतर काही वेळातच दुर्घटनाग्रस्त झालं. या भीषण अपघातात विमानात एकूण 242 जण प्रवास करत होते, त्यामध्ये 2 लहान मुले आणि 10 क्रू सदस्यांचा समावेश होता. Ahmedabad Plane Crash Updates अपघातानंतर जळालेल्या विमानाच्या धुराचे मोठे लोळ दूरवरून दिसत होते. या दुर्घटनेमुळे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली. नायडू हे तातडीने अहमदाबादला रवाना झाले असून बचाव व मदतकार्यांची प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

एअर इंडिया अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत म्हटलं, “ही अतिशय हृदयद्रावक घटना असून आमच्या सर्व टीमकडून आपत्कालीन मदतकार्य सुरू आहे. पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत पुरवण्यासाठी केंद्र स्थापन करण्यात आले आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0