देश-विदेश
Trending

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमानाचा भीषण अपघात!

Ahmedabad Plane Crash :  AI-171 विमान उड्डाणानंतर काही क्षणांत कोसळले; 242 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात

ANI :- अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे जाणारे एअर इंडिया फ्लाइट AI-171 गुरुवारी दुपारी उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच भीषण अपघातग्रस्त झाले. या विमानात 242 प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य होते. विमान थेट विमानतळाच्या सीमारेषेवर असलेल्या डॉक्टर्स हॉस्टेलवर कोसळले. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठा स्फोट झाला असून आगीचे ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरूनही दिसत आहेत. Ahmedabad Plane Crash Latest News

अपघातानंतर आपत्कालीन बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्य सुरू आहे. अद्याप अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डॉक्टर्स हॉस्टेलवर आदळल्याने परिसरात अफरातफरी; बचावकार्य सुरु

फोटो गॅलरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0