Aditya Thackeray On Shivsena MNS Yuri : मराठीसाठी जे लढतील, त्यांच्यासोबत जाण्यास आम्ही तयार” — आदित्य ठाकरे
मुंबई :- उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आणि राज ठाकरे Raj Thackeray यांच्यातील सुसंवाद व एकत्र येण्याच्या चर्चांना आज नवसंजीवनी मिळाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांनी दिलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, “आम्ही महाराष्ट्र आणि मराठी जनतेच्या हितासाठी झगडणाऱ्या कोणत्याही पक्षासोबत युतीस तयार आहोत. बदल घडवून आणणे ही आपली जबाबदारी आहे.” त्यांच्या या विधानातून राज ठाकरे यांच्या मनसेसोबतच्या राजकीय जवळिकीच्या चर्चा अधिकच गडद झाल्या आहेत.
दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी मनसेचे वरिष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना (UBT) ला आव्हान देत म्हटलं होतं की, “जर खरोखरच शिवसेना युतीस इच्छुक असेल, तर आदित्य ठाकरे यांनी स्वतः राज ठाकरे यांची भेट घेतली पाहिजे. फक्त कनिष्ठ नेत्यांना पाठवून युती साध्य होणार नाही.”
या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मुखपत्र ‘सामना’त नुकतीच प्रसिद्ध झालेली ठाकरे बंधूंची एकत्रित छायाचित्रे चर्चेचा विषय ठरली. उद्धव ठाकरे यांनीही “जनतेच्या मनात जे आहे, तेच होणार,” असे सूचक विधान करून राजकीय वर्तुळात संभाव्य युतीचा संकेत दिला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…