क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Kalyan Crime News : कल्याणमध्ये विमान तिकीट फसवणुकीचा प्रकार; एजंटने पर्यटन कंपनीला 15 लाखांचा गंडा घातला!

Kalyan Latest Fraud News : 500 विद्यार्थ्यांच्या तिकिटांसाठी 29 लाखांची वसुली; 250 जणांची तिकिटे काढून उर्वरित विद्यार्थ्यांची केली फसवणूक

कल्याण :- कल्याण पश्चिमेकडील बेतुरकरपाडा, गणेशनगर परिसरातील एका विमान तिकीट मध्यस्थाने खडकपाडा येथील एका पर्यटन कंपनीची तब्बल 15 लाख 37 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Kalyan Plane Ticket Scam चेंबूर येथील 500 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मुंबई ते दिल्ली विमान तिकिटांचे आश्वासन देऊन, मध्यस्थाने पर्यटन कंपनीकडून एकूण 29 लाख 78 हजार रुपये वसूल केले. मात्र, प्रत्यक्षात केवळ 250 विद्यार्थ्यांचीच तिकिटे काढून उर्वरित विद्यार्थ्यांची तिकिटे दिली नाहीत, अशी तक्रार खडकपाडा पोलिस ठाण्यात Khadakpada Police Station दाखल करण्यात आली आहे. Kalyan Latest Crime News

खडकपाडा येथील मंगला व्हॅली गृहसंकुलातील पर्यटन कंपनीच्या संचालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, बेतुरकरपाडा येथील गणेश नगर परिसरातील तिवारी इमारतीत राहणाऱ्या एका 30 वर्षीय मध्यस्थाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक सप्टेंबर 2024 ते जुलै 2025 या कालावधीत घडली आहे.

खडकपाडा येथील मंगला व्हॅली गृहसंकुलातील पर्यटन कंपनीच्या संचालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, बेतुरकरपाडा येथील गणेश नगर परिसरातील तिवारी इमारतीत राहणाऱ्या एका 30 वर्षीय मध्यस्थाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक सप्टेंबर 2024 ते जुलै 2025 या कालावधीत घडली आहे.

कल्याणमधील संबंधित पर्यटन कंपनीने चेंबूर येथील शाह अँड अँकर कच्छी इंजिनिअरिंग महाविद्यालयातील 500 विद्यार्थ्यांच्या मुंबई ते दिल्ली विमान प्रवासाची तिकिटे काढून देण्याचे काम घेतले होते. यासाठी लागणारी तिकिटे काढून देण्याचे काम त्यांनी बेतुरकरपाडा येथील त्या मध्यस्थाला दिले.

मध्यस्थाने टप्प्याटप्प्याने पर्यटन कंपनीकडून पैसे घेतले

पहिल्या टप्प्यात 100 विद्यार्थ्यांचे प्रति विद्यार्थी 5,700 रुपये याप्रमाणे एकूण 5 लाख 70 हजार रुपये.

दुसऱ्या टप्प्यात 150 विद्यार्थ्यांचे प्रति विद्यार्थी 5,800 रुपये याप्रमाणे एकूण 8 लाख 70 हजार रुपये.

तिसऱ्या टप्प्यात 250 विद्यार्थ्यांचे प्रति विद्यार्थी 6,150 रुपये याप्रमाणे 15 लाख 37 हजार 500 रुपये.
असे करत, मध्यस्थाने पर्यटन कंपनीकडून एकूण 29 लाख 78 हजार 500 रुपये वसूल केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0