Shantidoot Parivar | डॉ. विठ्ठल जाधव व विद्या जाधव दाम्पत्याला ग्लोबल एक्सेलन्स अवार्ड

- गोवा येथील कार्यक्रमात पुरस्कार प्रदान
पणजी, महाराष्ट्र मिरर : Mubarak Jineri
विशेष प्रतिनिधी
Shantidoot Parivar | शांतिदूत परिवाराच्या माध्यमातून सामाजिक सेवेत मोलाची कामगीरी करणाऱ्या माजी पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव व विद्या जाधव यांचा नुकताच पणजी येथील कार्यक्रमात ग्लोबल एक्सेलन्स पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

माजी सनदी अधिकारी दाम्पत्याकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतिदूत परिवाराच्या माध्यमातून चाललेल्या उपक्रमांची दखल घेत त्यांना ग्लोबल एक्सेलन्स देण्यात आला. शाल, सन्मानचिन्ह, गौरवपत्र, पदक व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इंग्लंड या संस्थेची स्मरणिका देऊन सत्कार करण्यात आला. अभिनेते करण मेहरा, अध्यक्ष मनीषकुमार, उपाध्यक्ष डॉ. दीपक हारके यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी अभिनेत्री हिमानी शिवपुरी, अभिनेते सचिन पारीख, हितेश भारद्वाज, अक्षदा मुदगल, रुपाली शर्मा यांच्यासह शांतिदूत परिवाराचे सदस्य उपस्थित होते.



