Adai Village: आदई पाण्याखाली बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणाचा नागरिकांना फटका

Panvel Adai village : सरपंच ग्रामसेवक फोन करून देखील गैर हजर
पनवेल (जितीन शेट्टी) : आदई गाव पहिल्याच झालेल्या मुसळधार पावसात पाण्याखाली गेलेले आहे. आदई गावात अनेक इमारतींची कामे सुरु आहेत. इमारती बांधताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. रस्त्यावर गुडघ्याच्या वर पाणी साचल्याने गाड्या अर्ध्या पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. एवढे असून सुद्धा लोकप्रतिनिधी व प्रशासन झोपा काढत आहेत. पावसाळा सुरुवात झाल्यापासून काळ रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. पहिल्याच मुसळधार पावसात हि अवस्था आहे. त्यामुळे संपूर्ण पावसाळा पाण्याखाली काढावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर साचलेले पाणी पंपाच्या मदतीने कमी करण्याचा प्रयत्नही होताना दिसत नाही. एकंदर हा पावसाळा आदईकरांसाठी आव्हानात्मक असणार हे निश्चित. Panvel Adai village Latest News




पनवेल/ प्रतिनिधी
आदई गाव पहिल्याच झालेल्या मुसळधार पावसात पाण्याखाली गेलेले आहे. आदई गावात अनेक इमारतींची कामे सुरु आहेत. इमारती बांधताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. रस्त्यावर गुडघ्याच्या वर पाणी साचल्याने गाड्या अर्ध्या पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. एवढे असून सुद्धा लोकप्रतिनिधी व प्रशासन झोपा काढत आहेत. पावसाळा सुरुवात झाल्यापासून काळ रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. पहिल्याच मुसळधार पावसात हि अवस्था आहे. त्यामुळे संपूर्ण पावसाळा पाण्याखाली काढावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर साचलेले पाणी पंपाच्या मदतीने कमी करण्याचा प्रयत्नही होताना दिसत नाही. एकंदर हा पावसाळा आदईकरांसाठी आव्हानात्मक असणार हे निश्चित. Panvel Adai village Latest News