मुंबई

Actor Govinda News : चाहत्यांच्या चिंतेत भर! अभिनेता गोविंदा अचानक बेशुद्ध, जुहूतील रुग्णालयात दाखल

Actor Govinda Latest News : धर्मेंद्र यांच्या उपचारांनंतर आता गोविंदाच्या प्रकृती अस्वास्थामुळे बॉलिवूडमध्ये काळजीचे वातावरण

मुंबई :- ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे चाहत्यांमध्ये आधीच चिंतेचे वातावरण असताना, आता बॉलिवूड अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा Actor Govinda अचानक बेशुद्ध पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री गोविंदा यांना तातडीने जुहू येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, 61 वर्षीय गोविंदा यांना मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी अचानक चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. डिसओरिएंटेशनमुळे त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना रात्री 1 वाजताच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रकृतीबद्दल माहिती

गोविंदा यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

ललित बिंदल म्हणाले, “गोविंदाजींना अचानक बेशुद्ध झाल्यानंतर क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून, त्यांच्या सर्व महत्त्वाच्या पॅरामीटर्सवर तपासण्या केल्या जातील आणि कशामुळे त्रास झाला, याचा निष्कर्ष काढला जाईल.”

रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाहत्यांकडून गोविंदा यांना लवकर आराम मिळावा यासाठी प्रार्थना केली जात आहे. गोविंदा यांच्या प्रकृतीचा तपशील लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे.

vivek

Recent Posts